राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात संपन्न

 राधानगरी महाविद्यालय राधानगरी येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात संपन्न झाला.

दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी राधानगरी महाविद्यालय राधानगरी च्या ग्रंथालय हॉलमध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र.प्रचार्य डॉ. वसंत ढेरे होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करताना समाजसेवेसाठी व राष्ट्रउभारणीसाठी युवकां बरोबरच सर्वांनी सहकार्य करावे असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. विश्वास पाटील कौलवकर यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना बद्दल सविस्तर माहिती प्रा. संग्राम सिंह पाटील व प्रा. ज्योती इंगवले यांनी दिली. अध्यक्षपदावरून बोलताना प्र. प्राचार्य डॉ. वसंत ढेरे यांनी not me but you या ब्रीद वाक्याचा अर्थ सांगून समाजसेवेसाठी सर्वांनी तत्पर रहावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आभार प्रा. के. वाय ए. एकल यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ. नितीन जरंडीकर, प्रा. मोकाशी, ग्रंथपाल के एम कुंभार प्रा. बी. के. पाटील व सर्व कर्मचारी उपस्थित होते.






Comments

Popular posts from this blog

राधानगरी महाविद्यालयास नॅककडून बी प्लस ग्रेड प्रदान

प्रजासत्ताक दिन संपन्न

नॅक पिअर टीमची महाविद्यालयास भेट