Posts

Showing posts from February, 2021

राधानगरी महाविद्यालयामध्ये मराठी भाषा दिन साजरा

Image
राधानगरी ता.२७: ‘जागतिकीकरण आणि त्यापाठोपाठ झालेले तंत्रज्ञानाचे आक्रमण यामध्ये असंख्य भाषा होरपळून निघत असल्या तरी मराठी भाषा या साऱ्याला पुरून उरणारी आहे’, असे गौरवोद्गार कथाकार मा. मारुती मांगोरे यांनी राधानगरी महाविद्यालय, राधानगरी येथे संपन्न झालेल्या मराठी भाषा दिन प्रसंगी काढले. आज दिनांक २७ फेब्रुवारी २०२१ रोजी राधानगरी महाविद्यालयामध्ये 'मराठी भाषा दिन' संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. या वेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे वाचन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. व्ही. डी. ढेरे हे होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. बी. के पाटील यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील यांनी करुन दिला. संग्रामसिंह पाटील यांनी आभार मानले, सुञसंचालन प्रा जे डी इंगवले यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कोव्हीड महामारीच्या पार्श्वभूमीवर मास्क सक्ती, सॅनिटायझर वापर आणि सोशल डिस्ट्न्सिंग या नियमांचे पालन करण

प्रजासत्ताक दिन संपन्न

Image
 श्री राधानगरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राधानगरी विद्यालय, राधानगरी उच्च माध्यमिक विद्यालय आणि राधानगरी महाविद्यालय, राधानगरी यांच्यावतीने मंगळवार दि. २६ जानेवारी २०२१ रोजी ७२वा प्रजासत्ताक दिन महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न झाला. यावेळी कोव्हीड आणि लॉकडाऊनच्या काळात अथक प्रयत्न करणारे कोव्हीड योद्धे  राधानगरी ग्रामीण रुग्णालय, राधानगरीचे अधीक्षक डॉ. जी. बी. गवळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. रणधीर कांबळे, प्राचार्य डॉ. डी एस मोरुस्कर, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित  होते.  

अल्पसंख्यांक दिन संपन्न

Image
आज दिनांक 18 डिसेंबर 2020 हा दिवस राधानगरी महाविद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिन म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. वसंत ढेरे हे होते. प्रा. के. वाय. एकल यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना प्रमुख वक्ते डॉ. विश्वास पाटील कौलवकर यांनी पार्श्वभूमी विशद करून अल्पसंख्यांक समाजाला न्याय हक्क कसे मिळवून देता येतील याविषयी विवेचन केले. अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. वसंत ढेरे यांनी भारतातील विविध अल्पसंख्यांक समाज त्यांची परिस्थिती आणि त्यांची न्याय हक्क याबद्दल जागरूक राहिले पाहिजे असे विवेचन केले. कार्यक्रमाचे आभार ग्रंथपाल प्रा. के. एम. कुंभार यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

।।राधानगरी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय शिक्षण दिन संपन्न ।।

Image
धर्मचिकित्सा करताना समाजाचा रोष नेहमी पत्कारावा लागतो. परंतु अशाही परिस्थितीमध्ये आपला लढा चालू ठेवत शिक्षण आणि समाज सुधारणा यासाठी माैलाना अबुल कलाम आझाद यांनी मोठे योगदान दिल्याचे उद्गार डाॅ. विश्वास पाटील काैलवकर यांनी काढले. ते राधानगरी महाविद्यालयामध्ये संपन्न झालेल्या राष्ट्रीय शिक्षण दिन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ. व्ही. डी. ढेरे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात डाॅ. ढेरे यांनी माैलाना आझाद यांच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाबरोबरीने त्यांच्या शिक्षणविषयक विचारांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. एन् ए. जरंडीकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन बी. के. पाटील यांनी केले. कार्यक्रमाला ग्रंथपाल के. एम्. कुंभार, पी. ए. मोकाशी, के. वाय. एकल, आर. के. पाटील, ए. पी. कांबळे व महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कोवीड पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. पी.सी.: के. वाय. एकल

।।राधानगरी महाविद्यालयात ग्राहक संरक्षण आणि आर्थिक साक्षरता वेबीनार संपन्न।।

Image
राधानगरी महाविद्यालय आणि कन्झ्युमर गायडन्स सोसायटी आॅफ इंडिया, मुंबई याच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २४ आॅक्टोबर २०२० रोजी ग्राहक संरक्षण आणि आर्थिक साक्षरता या विषयावरती वेबीनारचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात जमना वरदचारी, संपादक ‘किमत’ नियतकालिक यांनी ग्राहक संरक्षण या विषयावर उद्बोधन केले. यावेळी त्यांनी खोट्या जाहिरातींना न भुलता आपली फसवणूक कशी टाळावी याचा उहापोह केला. वेबीनारच्या दुसऱ्या सत्रात गणेश भट्ट, मास्टर ट्रेनर आर ॲंड जी इन्स्टीट्यूट, मुंबई यांनी आर्थिक साक्षरता या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी कोवीड परिस्थितीमुळे आर्थिक गुंतवणूकीचा मुद्दा कसा कळीचा बनला आहे हे विशद केले. वेबीनार संपन्न झाल्यानंतर उपस्थितांना ई-सर्टिफिकेट्स आणि रिझर्व बॅंक आॅफ इंडियाने प्रकाशित केलेल्या ‘फिनान्शियल अवेअरनेस मेसेजेस’(फेम) ई-पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. वेबीनारचे सूत्रसंचालन टि. आर पांडे (प्रोजेक्ट मॅनेजर, सीजीएस्आय) व तांत्रिक बाजू आनंद शर्मा (सीजीएस्आय) यांनी सांभाळली. जरंडीकर एन्. ए. यांनी वेबीनारचे समन्वयक म्हणून काम पाहिले. वेबीनारसाठी महाविद्याल

।।राधानगरी महाविद्यालय, राधानगरी येथे वाचन प्रेरणा दिन संपन्न।।

Image
भारताचे माजी राष्ट्रपती मा. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आज दिनांक १५/१०/२०२० रोजी राधानगरी महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. विश्वास पाटील कौलवकर सर यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष. राधानगरी महाविद्यालय राधानगरी चे प्रभारी प्राचार्य डॉ. वसंत ढेरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनानंतर प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रा. जयवंत सुतार. प्र. प्राचार्य पार्वतीबाई मोरे महिला महाविद्यालय सरवडे यांनी ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला व जीवनातील वाचनाचे महत्त्व समजावून सांगितले उच्च ध्येय घेऊन सुखी समाधानी व संपन्न जीवन जगण्यासाठी अभिरुची संपन्न वाचन अत्यंत महत्त्वाचे आहे असे उद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. वसंत ढेरे यांनी काढले. यावेळी विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन प्राध्यापक व विद्यार्थी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. के. वाय. एकल यांनी मानले.

राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात संपन्न

Image
  राधानगरी महाविद्यालय राधानगरी येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात संपन्न झाला. दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी राधानगरी महाविद्यालय राधानगरी च्या ग्रंथालय हॉलमध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र.प्रचार्य डॉ. वसंत ढेरे होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करताना समाजसेवेसाठी व राष्ट्रउभारणीसाठी युवकां बरोबरच सर्वांनी सहकार्य करावे असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. विश्वास पाटील कौलवकर यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना बद्दल सविस्तर माहिती प्रा. संग्राम सिंह पाटील व प्रा. ज्योती इंगवले यांनी दिली. अध्यक्षपदावरून बोलताना प्र. प्राचार्य डॉ. वसंत ढेरे यांनी not me but you या ब्रीद वाक्याचा अर्थ सांगून समाजसेवेसाठी सर्वांनी तत्पर रहावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. के. वाय ए. एकल यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ. नितीन जरंडीकर, प्रा. मोकाशी, ग्रंथपाल के एम कुंभार प्रा. बी. के. पाटील व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. डी.एस. मोरूस्कर यांची शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या व्यवस्थापन परिषद सदस्यपदी अभिनंदनीय निवड!

Image
  राधानगरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एस. मोरूस्कर सर यांची शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर च्या व्यवस्थापन परिषद सदस्य पदी निवड झाली. याबद्दल आज दिनांक २१ सप्टेंबर २०२० रोजी राधानगरी महाविद्यालयाच्या ग्रंथालय हॉलमध्ये श्री राधानगरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ राधानगरी चे कार्याध्यक्ष माननीय सुशील शंकराराव पाटील कौलवकर यांच्या हस्ते फेटा बांधून, शाल ,श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा.डॉ. विश्वास पाटील कौलवकर यांनी केले. संस्थेचे कार्याध्यक्ष मा. सुशील पाटील कौलवकर यांनी माझे वडील शंकरराव पाटील कौलवकर यांनी दुर्गम भागात सुरू केलेल्या या महाविद्यालयाचे रूपांतर वटवृक्षात होत असताना त्याचेच फलित म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. मोरूस्कर सर यांची पहिल्यांदा विद्याशाखा अधिष्ठाता म्हणून शिवाजी विद्यापीठात निवड झाली. आता शिवाजी विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलच्या सन्माननीय सदस्यपदी निवड झाली ही संस्थेच्या व महाविद्यालयाच्या दृष्टीने निश्चितच कौतुकास्पद गोष्ट आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ.

महाविद्यालयामध्ये शिक्षक दिन संपन्न

Image
  झपाट्याने बदलणाऱ्या समाजव्यवस्थेमध्ये शिक्षकांची जबाबदारी मोठी असल्याचे प्रतिपादन प्रा. बी. के. पाटील यांनी महाविद्यालयात संपन्न झालेल्या शिक्षक दिनावेळी केले. डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतींना उजाळा देताना त्यांनी डाॅ राधाकृष्णन भारताचे राष्ट्रपती तसेच उपराष्ट्रपती होते; त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा विद्यार्थांनी व्यक्त केली तेव्हापासून ५सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो; त्यांचा तत्वज्ञान शिकविण्यात हातखंडा असल्याने राधाकृष्णन विद्यार्थीप्रिय शिक्षक होते इत्यादी गोष्टींचा उहापोह केला. या कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालय हाॅलमध्ये करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डाॅ एकनाथ पाटील(हिंदी विभाग प्रमुख)यांनी केले. कार्यक्रमात प्रा. पी. ए. मोकाशी , प्रा एस आर सावंत यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रतिमा पूजन प्रा.डाॅ. एकनाथ पाटील यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डाॅ एन ए जरंडीकर होते. आभार ग्रंथपाल के एम कुंभार यांनी मानले, तर सुञसंचालन प्रा. संग्रामसिंह पाटील यांनी केले. कार्यक्रम शिक्षक व शिक्

राधानगरी महाविद्यालयाचे डाॅ. विश्वास पाटील यांची अभिनंदनीय निवड!

Image
  मराठा सेवा संघ महाराष्ट्र संचलित जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र या संत तुकोबाराय साहित्य व विचार परिषदेच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी राधानगरी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. विश्वास शंकरराव पाटील यांची निवड झाली. या निवडीबद्दल डॉ. विश्वास पाटील कौलवकर यांचा सत्कार समारंभ राधानगरी महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक डॉ. वसंत ढेरे यांनी केले. सत्कार मूर्ती डॉ. विश्वास पाटील यांचा सत्कार शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर चे डीन व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस्. मोरुस्कर सर यांच्या हस्ते शाल-श्रीफळ व फेटा बांधून आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डाॅ. विश्वास पाटील यांनी तूकोबाराय परिषदेची भूमिका आणि तुकोबांच्या विचारांची आजच्या काळामध्ये असणारी गरज याविषयी आपले विचार मांडले.कार्यक्रमाचे आभार डॉ. नितीन जरंडीकर सर यांनी मानले. महाविद्यालया चे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.