।।राधानगरी महाविद्यालयात ग्राहक संरक्षण आणि आर्थिक साक्षरता वेबीनार संपन्न।।
राधानगरी महाविद्यालय आणि कन्झ्युमर गायडन्स सोसायटी आॅफ इंडिया, मुंबई याच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २४ आॅक्टोबर २०२० रोजी ग्राहक संरक्षण आणि आर्थिक साक्षरता या विषयावरती वेबीनारचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात जमना वरदचारी, संपादक ‘किमत’ नियतकालिक यांनी ग्राहक संरक्षण या विषयावर उद्बोधन केले. यावेळी त्यांनी खोट्या जाहिरातींना न भुलता आपली फसवणूक कशी टाळावी याचा उहापोह केला. वेबीनारच्या दुसऱ्या सत्रात गणेश भट्ट, मास्टर ट्रेनर आर ॲंड जी इन्स्टीट्यूट, मुंबई यांनी आर्थिक साक्षरता या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी कोवीड परिस्थितीमुळे आर्थिक गुंतवणूकीचा मुद्दा कसा कळीचा बनला आहे हे विशद केले. वेबीनार संपन्न झाल्यानंतर उपस्थितांना ई-सर्टिफिकेट्स आणि रिझर्व बॅंक आॅफ इंडियाने प्रकाशित केलेल्या ‘फिनान्शियल अवेअरनेस मेसेजेस’(फेम) ई-पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. वेबीनारचे सूत्रसंचालन टि. आर पांडे (प्रोजेक्ट मॅनेजर, सीजीएस्आय) व तांत्रिक बाजू आनंद शर्मा (सीजीएस्आय) यांनी सांभाळली. जरंडीकर एन्. ए. यांनी वेबीनारचे समन्वयक म्हणून काम पाहिले. वेबीनारसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. सदर वेबीनारचे आयोजन गुगल मीटद्वारे करण्यात आले. (मिटींग आयडी:meet.google.com/cdv-iyov-css)
Comments
Post a Comment