महाविद्यालयाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा विभागीय स्पर्धेचे आयोजन


 

                  विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये खेळाचे महत्त्व जाणून घेऊन योग्य ती दिशा घेतली तर निश्चित ऑलिम्पिकचे ध्येय शिवाजी विद्यापीठासाठी दूर नाही असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी..टी.शिर्के यांनी केले. शिवाजी विद्यापीठ व राधानगरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोल्हापूर जिल्हा विभागीय स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. समारंभास कोल्हापूर जिल्हा क्रीडा परिषदेच्या अध्यक्ष प्राचार्य डॉ. पाटील , तसेच क्रीडा विभागाचे  प्रभारी संचालक डॉ.पी. टी.गायकवाड, राधानगरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी.एस.मोरूस्कर, बिद्री महाविद्यालयाचे प्रो. एन. डी. पाटील सर व मान्यवर उपस्थित होते.

        यावेळी बोलताना कुलगुरू पुढे म्हणाले, आपल्याला 2024  ओलंपिकचे उद्दिष्ट पार पाडायचे आहे त्यासाठी सर्वांनी मेहनत घ्यावी व शिवाजी विद्यापीठाचा नावलौकिक देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर करावा असेही ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. निलेश पाटील यांनी केले. शेवटी आभार प्रा डॉ विश्वास पाटील यांनी मानले. सदर स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील 70 महाविद्यालयातील 650 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.  स्पर्धा शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅक वरती १०,११ आणि १२ डिसेंबर २०२१ अशा  तीन दिवस सुरू होत्या. शेवटी बक्षीस वितरण समारंभ पार पडला आणि जिल्हा विभागीय स्पर्धा संपन्न झाल्या.










Comments

Popular posts from this blog

राधानगरी महाविद्यालयास नॅककडून बी प्लस ग्रेड प्रदान

राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात संपन्न

प्रजासत्ताक दिन संपन्न