Posts

Showing posts from December, 2021

महाविद्यालयाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा विभागीय स्पर्धेचे आयोजन

Image
                    विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये खेळाचे महत्त्व जाणून घेऊन योग्य ती दिशा घेतली तर निश्चित ऑलिम्पिकचे ध्येय शिवाजी विद्यापीठासाठी दूर नाही असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी..टी.शिर्के यांनी केले. शिवाजी विद्यापीठ व राधानगरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोल्हापूर जिल्हा विभागीय स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. समारंभास कोल्हापूर जिल्हा क्रीडा परिषदेच्या अध्यक्ष प्राचार्य डॉ. पाटील , तसेच क्रीडा विभागाचे  प्रभारी संचालक डॉ.पी. टी.गायकवाड, राधानगरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी.एस.मोरूस्कर, बिद्री महाविद्यालयाचे प्रो. एन. डी. पाटील सर व मान्यवर उपस्थित होते.         यावेळी बोलताना कुलगुरू पुढे म्हणाले, आपल्याला 2024  ओलंपिकचे उद्दिष्ट पार पाडायचे आहे त्यासाठी सर्वांनी मेहनत घ्यावी व शिवाजी विद्यापीठाचा नावलौकिक देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर करावा असेही ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. निलेश पाटील यांनी केले. शेवटी आभार प्रा डॉ विश्वास पाटील यांनी मानले. सदर स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील 70 महावि