राधानगरी महाविद्यालयास नॅककडून बी प्लस ग्रेड प्रदान
राधानगरी महाविद्यालयास नॅककडून बी प्लस ग्रेड प्रदान नॅक, बेंगलोर यांचेकडून राधानगरी महाविद्यालयाच्या नोव्हेंबर २०२१ पासून सुरू झालेल्या मूल्यमापन प्रक्रियेचा शेवटचा टप्पा म्हणून दि. २५/२६ जुलै २०२२ रोजी कृष्णा विद्यापीठ, हैद्राबादचे माजी कुलगुरू डॅा. व्यंकय्या हुन्नाम यांच्या अध्यक्षतेखाली पिअर टिमने महाविद्यालयास भेट दिली. यावेळी पिअर टिमने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बरोबरीने संस्था प्रतिनिधी, आजी-माजी विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधला. डोंगराळ, दुर्गम आणि अभयारण्य अधिवासातील परिसरात महाविद्यालयाचे उच्च शिक्षणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे मत यावेळी पिअर टिमने नोंदवले. गेले ६ महिने सुरू असलेल्या नॅक प्रक्रियेचा आज अंतिम निकाल आला असून महाविद्यालयास २.७० इतके गुण व बी प्लस ही ग्रेड प्राप्त झाली आहे. महाविद्यालयास मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल विद्यार्थी आणि ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment