Posts

Showing posts with the label News

NAAC PEER TEAM VISIT SCHEDULED

 As a part of the assessment and accreditation process, the NAAC Peer Team is scheduled and would be visiting Radhanagari Mahavidyalaya, Radhanagari on 25th and 26th July 2022. It will be a three member Peer Team. Dr Venkaiah Vunnam (Former VC, Krishna University) will be the chairperson of the committee. Dr Pooran Kavidayal (Professor and Dean, Faculty of Management, Kumaun University, Nainital) will be the Member-Coordinator and Dr Rakesh Rao (Principal, B. P. Brahmbhatt Arts and M. H. Guru Commerce College, Mehsana) will be the member of the committee. During the onsite visit, the Peer Team will interact with all the stakeholders of the institution including present students, alumni and parents. The preparation of the Peer Team visit at the institution level is in the final stage, and the institution is looking forward to the onsite visit of the Peer Team.

नॅक पिअर टीमची महाविद्यालयास भेट

 नॅक या राष्ट्रीय पातळीवरील भारत सरकारच्या संस्थेकडून महाविद्यालयाच्या मूल्यमापन प्रक्रियेचा भाग म्हणून नॅक  पिअर टीम महाविद्यालयास दि. २५ आणि २६ जुलै २०२२ रोजी भेट देणार आहे. तीन सदस्यांच्या समितीमध्ये डॉ व्यंकय्या हुन्नाम (कृष्णा युनिव्हर्सिटी, हायद्राबाद) हे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहणार आहेत, तर डॉ. पुरन कविदयाल (प्रोफेसर व डीन, फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट, नैनिताल) हे मेंबर-को-ऑर्डीनेटर आणि डॉ. राकेश राव (प्राचार्य, श्री ब्रम्हभट्ट कॉलेज, म्हैसाणा, गुजरात) हे सदस्य म्हणून कामकाज पाहणार आहेत. सदर भेटीदरम्यान ते महाविद्यालयातील इतर घटकांबरोबरच महाविद्यालयाचे आजी/माजी विद्यार्थी आणि पालक यांच्याशी देखील संवाद साधणार आहेत. नॅक  पिअर टीम भेटीसाठीची महाविद्यालयाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे.    

विद्याविषयक लेखापरीक्षण समितीची महाविद्यालयास भेट

Image
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील तरतुदीनुसार  विद्याविषयक लेखापरीक्षणासंदर्भात शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी गठीत केलेल्या समितीने शुक्रवार दि. २२ जून २०२२ इ. रोजी महाविद्यालयास भेट दिली. प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार (विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर) यांनी सदर समितीचे अध्यक्ष म्हणून, तर डॉ. एन. एस. जाधव (श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर) यांनी समिती सदस्य म्हणून काम पहिले. महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. डी. एस. मोरुस्कर, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. एन. ए. जरंडीकर, शिक्षक प्रतिनिधी म्हणून डॉ. व्ही. डी. ढेरे, डॉ. इ. एस. पाटील व प्रा. बी. के. पाटील यांनी आणि प्रशासन प्रतिनिधी म्हणून श्री आर. के. पाटील यांनी संवाद साधला. महाविद्यालयातील भौतिक सुविधा आणि महाविद्यालयाने सदर केलेल्या कागदपत्रांची छाननी करून समितीने आपला अहवाल शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचेकडे सादर केला.  प्राचार्य. डॉ. आर. आर. कुंभार यांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ. डी. एस. मोरुसकर  डॉ. एन. एस. जाधव यांचे स्वागत करताना डॉ. एन. ए. जरंडीकर समितीशी संवाद साधताना प्राचार्य डॉ. डी...

योग दिवस संपन्न

Image
 २१ जून २०२२ इ रोजी महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. विश्वास पाटील-कौलवकर यांनी योगा प्रात्याक्षिके करून दाखवली व उपस्थित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून विविध योगासने करवून घेतली. आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन शारीरिक शिक्षण संचालक डॉ. निलेश पाटील यांनी केले.

शिवस्वराज्य दिन साजरा

Image
 राधानगरी महाविद्यालय राधानगरी येथे शिवस्वराज्य दिन साजरा. दिनांक 6 जून 2022 रोजी सकाळी नऊ वाजता राधानगरी महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी.एस. मोरुस्कर सर  होते.  प्रो.डॉ. वसंत ढेरे यांनी स्वराज्य ही कल्पना विशद करून शहाजी महाराज यांनी स्वराज्यसंकल्पना कशी वापरली हे सांगितले. जिजाबाईनी या स्वराज्य संकल्पनेसाठी कशी पायाभरणी केली हे सांगितले. छत्रपती शिवरायांनी लहानपणापासून केलेला संघर्ष आणि त्या पाठी मागची प्रेरणा स्वराज्य या बाबी सविस्तरपणे मांडल्या. स्वराज्याचे विरोधक त्यांच्याकडे असलेले सैन्य आणि स्वराज्याचे पाईक सैनिक शिबंदी या बाबी सविस्तरपणे सांगून राज्याभिषेकाचे महत्त्व राज्याभिषेका मुळे नवीन निर्माण झालेल्या बाबी आणि राज्याभिषेकाचे  परिणाम याविषयी सविस्तर माहिती दिली.   कार्यक्रमाचे स्वागत प्रा. संग्राम पाटील यांनी केले. डॉ. विश्वास पाटील कौलवकर यांनी प्रास्ताविक केले.आभार प्रा. प्रकाश कांबळे यांनी मानले. प्रा. एकल के. वाय. यांनी सूत्रसंचालन केले.

आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्त्व स्पर्धेत महाविद्यालयाचे यश

Image
 दि. ०६ मे २०२२ रोजी तुकाराम कृष्णाजी कालेकर कला-वाणिज्य महाविद्यालय, नेसरी येथे राजर्षी शाहू जन्मशताब्दीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्त्व स्पर्धेत महाविद्यालयाच्या कु. सविता चौगले (बी.ए. २) आणि कु. साऊताई बोभाटे (बी. कॉम. २) या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. सदर स्पर्धेत कु. साऊताई बोभाटे हिला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. सदर स्पर्धेसाठी विद्यार्थिनीना प्रा. बी. के. पाटील आणि प्रा. पी. ए. मोकाशी यांनी विशेष मार्गदर्शन केले. 

कै. शंकरराव पाटील कौलवकर स्मृती दिन संपन्न

Image
बुधवार दि. ०९ फेब्रुवारी २०२२ रोजी महाविद्यालयामध्ये  श्री राधानगरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष  कै. शंकरराव पाटील कौलवकर यांचा स्मृती दिन संपन्न झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात डॉ. व्ही. डी. ढेरे, डॉ. इ. एस. पाटील यांनी शंकरराव पाटील कौलवकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. संस्थेचे उपाध्यक्ष श्री मोहन नेवडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. व्ही. एस. पाटील यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. एन. ए. जरंडीकर यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.  

इंग्रजी विभागाचा MoU

Image
 राधानगरी महाविद्यालय, राधानगरी - इंग्रजी विभागाने देवचंद कॉलेज निपाणी, दुध-साखर महाविद्यालय, बिद्री, भोगावती महाविद्यालय, कुरुकली आणि सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगुड या महाविद्यालयांसोबत student and faculty exchange साठी MoU केलेला आहे. त्याचे नूतनीकरण दि. ०९ डिसेंबर २०२१ करण्यात आले. यावेळी प्रा. बी. जी. पाटील (देवचंद कॉलेज, निपाणी) आणि डॉ. सी. वाय. जाधव (दूध-साखर  महाविद्यालय, बिद्री) यांच्या उपस्थितीत मा. डॉ. डी. एस. मोरुस्कर यांनी सदर MoU वरती स्वाक्षरी केली.

कुस्ती स्पर्धेमध्ये महाविद्यालयाचे यश

Image
 दि. ०५ डिसेंबर २०२१ रोजी संपन्न झालेल्या राधानगरी महाविद्यालय राधानगरीच्या कुस्ती संघाने दहा गुण मिळवून स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला तसेच आपल्या महाविद्यालयाचा कु. कुलदीप बापुसो पाटील याने 71 किलो वजनी गटात तर कु. प्रतीक पंडित मेतर याने 80 किलो वजनी गटात सूवर्णपदक पटकावले. सदर खेळाडूंची शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. सर्व खेळाडूंचे महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन!

कबड्डी स्पर्धेमध्ये महाविद्यालयाचे यश

Image
 दि. ०४ डिसेंबर २०२१ रोजी राव कब्बडी अकॅडमी कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या कोल्हापूर विभागीय कबड्डी स्पर्धेत आपल्या महाविद्यालयाच्या संघाने उपांत्यपूर्व फेरी पर्यंत मजल मारली.उपांत्य फेरीच्य अटीतटीच्या सामन्यात अवघ्या १ गुणाने आजरा महाविद्यालय कडून पराभव पत्करावा लागला. सर्व खेळाडूंचे महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन!

महाविद्यालयाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा विभागीय स्पर्धेचे आयोजन

Image
                    विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये खेळाचे महत्त्व जाणून घेऊन योग्य ती दिशा घेतली तर निश्चित ऑलिम्पिकचे ध्येय शिवाजी विद्यापीठासाठी दूर नाही असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी..टी.शिर्के यांनी केले. शिवाजी विद्यापीठ व राधानगरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोल्हापूर जिल्हा विभागीय स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. समारंभास कोल्हापूर जिल्हा क्रीडा परिषदेच्या अध्यक्ष प्राचार्य डॉ. पाटील , तसेच क्रीडा विभागाचे  प्रभारी संचालक डॉ.पी. टी.गायकवाड, राधानगरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी.एस.मोरूस्कर, बिद्री महाविद्यालयाचे प्रो. एन. डी. पाटील सर व मान्यवर उपस्थित होते.         यावेळी बोलताना कुलगुरू पुढे म्हणाले, आपल्याला 2024  ओलंपिकचे उद्दिष्ट पार पाडायचे आहे त्यासाठी सर्वांनी मेहनत घ्यावी व शिवाजी विद्यापीठाचा नावलौकिक देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर करावा असेही ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. निलेश पाटील यांनी केले. शेवटी आभार प्...

महाविद्यालयामध्ये संविधान दिन संपन्न

Image
 भारत सरकारच्या "आझादी का अमृत महोत्सव" या उपक्रमाअंतर्गत आयोजित विविध कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम म्हणून आज शुक्रवार, दि. २६ नोव्हेंबर २०२१ रोजी महाविद्यालयामध्ये "संविधान दिनाचे" आयोजन करण्यात आले. सकाळी ठिक ११.०० वाजता महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी एकत्र जमले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. एन. ए. जरंडीकर यांनी लोकशाही, संविधान, हक्क आणि अधिकार या अनुषंगाने भूमिका मांडली. प्रा. ए. एम. कांबळे यांनी २६/११ च्या कटू स्मृती बाजूला सारून संविधान दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय यांचा जागर करण्याबाबतचे प्रतिपादन केले. डॉ. विश्वास पाटील-कौलवकर यांनी संविधान निर्मितीची प्रक्रिया आणि त्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान याचा उहापोह केला. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. व्ही. डी. ढेरे यांनी भारतीय समाजजीवनामध्ये असणारे संविधानाचे अनन्यसाधारण स्थान अधोरेखीत केले आणि आजच्या तरुणांनी आपल्या मुलभूत हक्कांबरोबरच आपल्या कर्तव्यांचेदेखील भान ठेवणे गरजेचे असल्याचे मत मांडले. अध्यक्षीय भाषणानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच...

" हिंदी दिवस " समारोह

Image
 राधानगरी दि. 26 अक्टूबर 2021 को राधानगरी महाविद्यालय राधानगरी  , जि. कोल्हापुर  में " हिंदी दिवस " समारोह संपन्न हुआ ।  कोराना के बढते प्रकोप के कारण महाविद्यालय खुला नहीं था और छात्रों की उपस्थिती महाविद्यालय में न होने के कारण सितंबर माह में 'हिंदी दिवस ' समारोह का आयोजन नहीं कर सके  थे । 20 अक्टूबर 2021 से महाविद्यालय खुले और महाविद्यालय में इस समरोह का आयोजन किया गया । इस समारोह के प्रमुख अतिथि के रूप में  प्रोफेसर  डॉ. अर्जुन चव्हाण, पूर्व अध्यक्ष ,हिंदी विभाग  शिवाजी विश्वविद्यालय, कोल्हापुर उपस्थित थे। साथ में कॉलेज के प्रधानाचार्य डॉ. मोरुस्कर, हिंदी विभाग अध्यक्ष, डॉ. एकनाथ पाटील, प्रा. आनंंदा कांबले, मराठी विभाग अध्यक्ष डॉ. बाजीराव पाटील, प्रा. ज्योति इंगवले आदि उपस्थित थे। समारोह का प्रास्ताविक तथा अतिथि स्वागत डॉ. एकनाथ पाटील जी ने किया, डॉ. अर्जुन चव्हाण जी को शाॅल तथा बूके देकर प्राचार्य मोरुस्कर जी ने स्वागत किया ।   अतिथि परिचय प्रा. आनंदा कांबळे जी ने किया।इस समारोह में डॉ अर्जुन चव्हाण जी ने राजभाषा हिंदी के बारे में अ...

माजी विद्यार्थी मेळावा महाविद्यालयांमध्ये संपन्न

Image
माजी विद्यार्थी  मेळावा  महाविद्यालयांमध्ये संपन्न राधानगरी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आज दि. 23 /10 /2021 इ. रोजी महाविद्यालयांमध्ये संपन्न झाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ वसंत ढेरे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. विश्वास पाटील यांनी केले.              या वेळी बोलताना प्रा. डॉ. ढेरे म्हणाले, महाविद्यालयीन जीवन जगत असताना आलेल्या अनुभवाची शिदोरी बरोबर घेऊन महाविद्यालयाच्या बाहेरचे जग जगताना या महाविद्यालयातील  संस्काराची शिदोरी बरोबर असल्याने संस्कारशील समाज निश्चित घडतो. या संस्कारशील विद्यार्थ्यां कडूनच भावी समाज सुसंस्कृत होतो. तसेच माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे वेळोवेळी लक्ष दिले तर आपल्या मागील पिढीलाही या शिदोरीचा  वाटा निश्चित मिळेल. तसेच इंग्रजीचे डॉ. नितीन जरंडीकर बोलताना म्हणाले,राधानगरी परिसराच्या विकासाच्या दिशेने जाताना इथल्या पर्यावरणाचा होत असणारा र्‍हास, इथल्या स्थानिक लोकांचे प्रश्न, समस्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जाणून घेऊन आपल्या शिक्षणाचा उप...

राधानगरी महाविद्यालय, राधानगरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

Image
 राधानगरी महाविद्यालय, राधानगरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि अंतर्यागत तक्रार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने  आज शुक्रवार,दि. ८ ऑक्टोबर २०२१ रोजी  सायबर गुन्हेगारी या विषयावर  श्रीमती अनुराधा पाटील पोलीस उपनिरीक्षक राधानगरी यांचे व्याख्यान आयोजित केले होते. आपल्या मनोगतात बोलताना अनुराधा पाटील म्हणाल्या, सायबर विषयक गुन्हे हे कधीही माणसाला फसवू शकतात,गुन्हात अडकवू शकतात विशेष करून मुलींनी मोबाईल वापरताना व्हाट्स अॅप असेल, इंस्टाग्राम असेल अथवा आणखी कोणतेही ॲप्स असेल तर अशा अॅपचा वापर करताना काळजीपूर्वक विचार करुन करावा हे ॲप्स खूप उपयुक्तही आहेत तेवढेच धोकादायक आहेत. त्यामुळे त्याचा वापर करताना समजून-उमजून करावा आणि सायबर गुन्हा च्या माध्यमातून खूप मोठी फसवणूक केली जाते असा विचार त्यांनी मांडला. त्याचबरोबर स्त्रियांचे कायदे स्त्रियांचे हक्क स्त्रियांच्या चळवळी याविषयी बोलताना त्यांनी स्त्री कायद्यातील   मुद्द्याच्या आधारे स्त्रीला न्याय मागता येऊ शकतो. स्त्री दुबळी नाही स्त्री सक्षम आहे. या अनुषंगाने आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात प्रा. ऐ...

राधानगरी महाविद्यालयात सत्कार समारंभ संपन्न

Image
  ।।राधानगरी महाविद्यालयात सत्कार समारंभ संपन्न।। “नेमून दिलेली कामे मी प्रामाणिकपणे करत राहिलो,नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत राहिलो, परिणामी अत्यंत समाधानी भावनेने मी आज सेवानिवृत्त होत आहे” असे भावोत्कट उद्गार राधानगरी महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक श्री. दिलीप सूर्यवंशी यांनी काढले. नियत वयोमानानुसार ते दि.३१मे२०२१ रोजी सेवानिवृत्त होत असल्याने राधानगरी महाविद्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभावेळी ते बोलत होते. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डाॅ. डी. एस. मोरूस्कर यांनी दिलीप सूर्यवंशी यांच्या प्रशासकीय कामकाजाबद्दल गाैरवोद्गार काढले. या प्रसंगी प्रा. डाॅ. एकनाथ पाटील, प्रा.डाॅ. विश्वास पाटील, प्रा.डाॅ. वसंत ढेरे, प्रा. ए. एम. कांबळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी प्रा. एस. आर. सावंत, प्रा. एस. आर. पाटील, के.एम.कुंभार, प्रा. कृष्णा एकल , प्रा. शरद आमते, मदन काळेबेरे, आर.के. पाटील, शिक्षेकेत्तर कर्मचारी व सुर्यवंशी परिवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. बी. के. पाटील(मराठी विभाग प्रमुख) यांनी केले. आभार प्रा. संग्रामसिंह पा...

राधानगरी महाविद्यालयामध्ये मराठी भाषा दिन साजरा

Image
राधानगरी ता.२७: ‘जागतिकीकरण आणि त्यापाठोपाठ झालेले तंत्रज्ञानाचे आक्रमण यामध्ये असंख्य भाषा होरपळून निघत असल्या तरी मराठी भाषा या साऱ्याला पुरून उरणारी आहे’, असे गौरवोद्गार कथाकार मा. मारुती मांगोरे यांनी राधानगरी महाविद्यालय, राधानगरी येथे संपन्न झालेल्या मराठी भाषा दिन प्रसंगी काढले. आज दिनांक २७ फेब्रुवारी २०२१ रोजी राधानगरी महाविद्यालयामध्ये 'मराठी भाषा दिन' संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. या वेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे वाचन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. व्ही. डी. ढेरे हे होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. बी. के पाटील यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील यांनी करुन दिला. संग्रामसिंह पाटील यांनी आभार मानले, सुञसंचालन प्रा जे डी इंगवले यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कोव्हीड महामारीच्या पार्श्वभूमीवर मास्क सक्ती, सॅनिटायझर वापर आणि सोशल डिस्ट्न्सिंग या नियमांचे पालन करण...

प्रजासत्ताक दिन संपन्न

Image
 श्री राधानगरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राधानगरी विद्यालय, राधानगरी उच्च माध्यमिक विद्यालय आणि राधानगरी महाविद्यालय, राधानगरी यांच्यावतीने मंगळवार दि. २६ जानेवारी २०२१ रोजी ७२वा प्रजासत्ताक दिन महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न झाला. यावेळी कोव्हीड आणि लॉकडाऊनच्या काळात अथक प्रयत्न करणारे कोव्हीड योद्धे  राधानगरी ग्रामीण रुग्णालय, राधानगरीचे अधीक्षक डॉ. जी. बी. गवळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. रणधीर कांबळे, प्राचार्य डॉ. डी एस मोरुस्कर, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित  होते.  

अल्पसंख्यांक दिन संपन्न

Image
आज दिनांक 18 डिसेंबर 2020 हा दिवस राधानगरी महाविद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिन म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. वसंत ढेरे हे होते. प्रा. के. वाय. एकल यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना प्रमुख वक्ते डॉ. विश्वास पाटील कौलवकर यांनी पार्श्वभूमी विशद करून अल्पसंख्यांक समाजाला न्याय हक्क कसे मिळवून देता येतील याविषयी विवेचन केले. अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. वसंत ढेरे यांनी भारतातील विविध अल्पसंख्यांक समाज त्यांची परिस्थिती आणि त्यांची न्याय हक्क याबद्दल जागरूक राहिले पाहिजे असे विवेचन केले. कार्यक्रमाचे आभार ग्रंथपाल प्रा. के. एम. कुंभार यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

।।राधानगरी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय शिक्षण दिन संपन्न ।।

Image
धर्मचिकित्सा करताना समाजाचा रोष नेहमी पत्कारावा लागतो. परंतु अशाही परिस्थितीमध्ये आपला लढा चालू ठेवत शिक्षण आणि समाज सुधारणा यासाठी माैलाना अबुल कलाम आझाद यांनी मोठे योगदान दिल्याचे उद्गार डाॅ. विश्वास पाटील काैलवकर यांनी काढले. ते राधानगरी महाविद्यालयामध्ये संपन्न झालेल्या राष्ट्रीय शिक्षण दिन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ. व्ही. डी. ढेरे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात डाॅ. ढेरे यांनी माैलाना आझाद यांच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाबरोबरीने त्यांच्या शिक्षणविषयक विचारांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. एन् ए. जरंडीकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन बी. के. पाटील यांनी केले. कार्यक्रमाला ग्रंथपाल के. एम्. कुंभार, पी. ए. मोकाशी, के. वाय. एकल, आर. के. पाटील, ए. पी. कांबळे व महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कोवीड पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. पी.सी.: के. वाय. एकल