महाविद्यालयामध्ये संविधान दिन संपन्न
भारत सरकारच्या "आझादी का अमृत महोत्सव" या उपक्रमाअंतर्गत आयोजित विविध कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम म्हणून आज शुक्रवार, दि. २६ नोव्हेंबर २०२१ रोजी महाविद्यालयामध्ये "संविधान दिनाचे" आयोजन करण्यात आले. सकाळी ठिक ११.०० वाजता महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी एकत्र जमले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. एन. ए. जरंडीकर यांनी लोकशाही, संविधान, हक्क आणि अधिकार या अनुषंगाने भूमिका मांडली. प्रा. ए. एम. कांबळे यांनी २६/११ च्या कटू स्मृती बाजूला सारून संविधान दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय यांचा जागर करण्याबाबतचे प्रतिपादन केले. डॉ. विश्वास पाटील-कौलवकर यांनी संविधान निर्मितीची प्रक्रिया आणि त्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान याचा उहापोह केला. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. व्ही. डी. ढेरे यांनी भारतीय समाजजीवनामध्ये असणारे संविधानाचे अनन्यसाधारण स्थान अधोरेखीत केले आणि आजच्या तरुणांनी आपल्या मुलभूत हक्कांबरोबरच आपल्या कर्तव्यांचेदेखील भान ठेवणे गरजेचे असल्याचे मत मांडले. अध्यक्षीय भाषणानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे प्रकट वाचन करण्यात आले. प्रा. के. वाय. एकल यांनी सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.
Comments
Post a Comment