Posts

Showing posts from June, 2021

राधानगरी महाविद्यालयात सत्कार समारंभ संपन्न

Image
  ।।राधानगरी महाविद्यालयात सत्कार समारंभ संपन्न।। “नेमून दिलेली कामे मी प्रामाणिकपणे करत राहिलो,नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत राहिलो, परिणामी अत्यंत समाधानी भावनेने मी आज सेवानिवृत्त होत आहे” असे भावोत्कट उद्गार राधानगरी महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक श्री. दिलीप सूर्यवंशी यांनी काढले. नियत वयोमानानुसार ते दि.३१मे२०२१ रोजी सेवानिवृत्त होत असल्याने राधानगरी महाविद्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभावेळी ते बोलत होते. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डाॅ. डी. एस. मोरूस्कर यांनी दिलीप सूर्यवंशी यांच्या प्रशासकीय कामकाजाबद्दल गाैरवोद्गार काढले. या प्रसंगी प्रा. डाॅ. एकनाथ पाटील, प्रा.डाॅ. विश्वास पाटील, प्रा.डाॅ. वसंत ढेरे, प्रा. ए. एम. कांबळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी प्रा. एस. आर. सावंत, प्रा. एस. आर. पाटील, के.एम.कुंभार, प्रा. कृष्णा एकल , प्रा. शरद आमते, मदन काळेबेरे, आर.के. पाटील, शिक्षेकेत्तर कर्मचारी व सुर्यवंशी परिवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. बी. के. पाटील(मराठी विभाग प्रमुख) यांनी केले. आभार प्रा. संग्रामसिंह पाटील