राधानगरी महाविद्यालयात सत्कार समारंभ संपन्न

 ।।राधानगरी महाविद्यालयात सत्कार समारंभ संपन्न।।

“नेमून दिलेली कामे मी प्रामाणिकपणे करत राहिलो,नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत राहिलो, परिणामी अत्यंत समाधानी भावनेने मी आज सेवानिवृत्त होत आहे” असे भावोत्कट उद्गार राधानगरी महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक श्री. दिलीप सूर्यवंशी यांनी काढले. नियत वयोमानानुसार ते दि.३१मे२०२१ रोजी सेवानिवृत्त होत असल्याने राधानगरी महाविद्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभावेळी ते बोलत होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डाॅ. डी. एस. मोरूस्कर यांनी दिलीप सूर्यवंशी यांच्या प्रशासकीय कामकाजाबद्दल गाैरवोद्गार काढले.
या प्रसंगी प्रा. डाॅ. एकनाथ पाटील, प्रा.डाॅ. विश्वास पाटील, प्रा.डाॅ. वसंत ढेरे, प्रा. ए. एम. कांबळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी प्रा. एस. आर. सावंत, प्रा. एस. आर. पाटील, के.एम.कुंभार, प्रा. कृष्णा एकल , प्रा. शरद आमते, मदन काळेबेरे, आर.के. पाटील, शिक्षेकेत्तर कर्मचारी व सुर्यवंशी परिवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. बी. के. पाटील(मराठी विभाग प्रमुख) यांनी केले. आभार प्रा. संग्रामसिंह पाटील यांनी मानले, तर सुञसंचालन प्रा. जे. डी. इंगवले यांनी केले.
कोव्हीड महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रातिनिधिक स्वरूपात, सोशल डिस्ट्न्सिींगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

(श्री दिलीप सूर्यवंशी यांचा मा. प्राचार्यांच्या हस्ते सत्कार)


(सत्काराला उत्तर देताना श्री. दिलीप सूर्यवंशी)


(अध्यक्षीय भाषण करताना मा. प्राचार्य डॉ. डी. एस. मोरुस्कर सर)





Comments

Popular posts from this blog

राधानगरी महाविद्यालयास नॅककडून बी प्लस ग्रेड प्रदान

राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात संपन्न

“ग्रंथ हेच गुरु"