Posts

राधानगरी महाविद्यालयास नॅककडून बी प्लस ग्रेड प्रदान

Image
 राधानगरी महाविद्यालयास नॅककडून बी प्लस ग्रेड प्रदान नॅक, बेंगलोर यांचेकडून राधानगरी महाविद्यालयाच्या नोव्हेंबर २०२१ पासून सुरू झालेल्या मूल्यमापन प्रक्रियेचा शेवटचा टप्पा म्हणून दि. २५/२६ जुलै २०२२ रोजी कृष्णा विद्यापीठ, हैद्राबादचे माजी कुलगुरू डॅा. व्यंकय्या हुन्नाम यांच्या अध्यक्षतेखाली पिअर टिमने महाविद्यालयास भेट दिली. यावेळी पिअर टिमने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बरोबरीने संस्था प्रतिनिधी, आजी-माजी विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधला. डोंगराळ, दुर्गम आणि अभयारण्य अधिवासातील परिसरात महाविद्यालयाचे उच्च शिक्षणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे मत यावेळी पिअर टिमने नोंदवले. गेले ६ महिने सुरू असलेल्या नॅक प्रक्रियेचा आज अंतिम निकाल आला असून महाविद्यालयास २.७० इतके गुण व बी प्लस ही ग्रेड प्राप्त झाली आहे. महाविद्यालयास मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल विद्यार्थी आणि ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

NAAC PEER TEAM VISIT SCHEDULED

 As a part of the assessment and accreditation process, the NAAC Peer Team is scheduled and would be visiting Radhanagari Mahavidyalaya, Radhanagari on 25th and 26th July 2022. It will be a three member Peer Team. Dr Venkaiah Vunnam (Former VC, Krishna University) will be the chairperson of the committee. Dr Pooran Kavidayal (Professor and Dean, Faculty of Management, Kumaun University, Nainital) will be the Member-Coordinator and Dr Rakesh Rao (Principal, B. P. Brahmbhatt Arts and M. H. Guru Commerce College, Mehsana) will be the member of the committee. During the onsite visit, the Peer Team will interact with all the stakeholders of the institution including present students, alumni and parents. The preparation of the Peer Team visit at the institution level is in the final stage, and the institution is looking forward to the onsite visit of the Peer Team.

नॅक पिअर टीमची महाविद्यालयास भेट

 नॅक या राष्ट्रीय पातळीवरील भारत सरकारच्या संस्थेकडून महाविद्यालयाच्या मूल्यमापन प्रक्रियेचा भाग म्हणून नॅक  पिअर टीम महाविद्यालयास दि. २५ आणि २६ जुलै २०२२ रोजी भेट देणार आहे. तीन सदस्यांच्या समितीमध्ये डॉ व्यंकय्या हुन्नाम (कृष्णा युनिव्हर्सिटी, हायद्राबाद) हे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहणार आहेत, तर डॉ. पुरन कविदयाल (प्रोफेसर व डीन, फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट, नैनिताल) हे मेंबर-को-ऑर्डीनेटर आणि डॉ. राकेश राव (प्राचार्य, श्री ब्रम्हभट्ट कॉलेज, म्हैसाणा, गुजरात) हे सदस्य म्हणून कामकाज पाहणार आहेत. सदर भेटीदरम्यान ते महाविद्यालयातील इतर घटकांबरोबरच महाविद्यालयाचे आजी/माजी विद्यार्थी आणि पालक यांच्याशी देखील संवाद साधणार आहेत. नॅक  पिअर टीम भेटीसाठीची महाविद्यालयाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे.    

विद्याविषयक लेखापरीक्षण समितीची महाविद्यालयास भेट

Image
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील तरतुदीनुसार  विद्याविषयक लेखापरीक्षणासंदर्भात शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी गठीत केलेल्या समितीने शुक्रवार दि. २२ जून २०२२ इ. रोजी महाविद्यालयास भेट दिली. प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार (विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर) यांनी सदर समितीचे अध्यक्ष म्हणून, तर डॉ. एन. एस. जाधव (श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर) यांनी समिती सदस्य म्हणून काम पहिले. महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. डी. एस. मोरुस्कर, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. एन. ए. जरंडीकर, शिक्षक प्रतिनिधी म्हणून डॉ. व्ही. डी. ढेरे, डॉ. इ. एस. पाटील व प्रा. बी. के. पाटील यांनी आणि प्रशासन प्रतिनिधी म्हणून श्री आर. के. पाटील यांनी संवाद साधला. महाविद्यालयातील भौतिक सुविधा आणि महाविद्यालयाने सदर केलेल्या कागदपत्रांची छाननी करून समितीने आपला अहवाल शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचेकडे सादर केला.  प्राचार्य. डॉ. आर. आर. कुंभार यांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ. डी. एस. मोरुसकर  डॉ. एन. एस. जाधव यांचे स्वागत करताना डॉ. एन. ए. जरंडीकर समितीशी संवाद साधताना प्राचार्य डॉ. डी. एस. मोरुस्कर, डॉ.

योग दिवस संपन्न

Image
 २१ जून २०२२ इ रोजी महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. विश्वास पाटील-कौलवकर यांनी योगा प्रात्याक्षिके करून दाखवली व उपस्थित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून विविध योगासने करवून घेतली. आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन शारीरिक शिक्षण संचालक डॉ. निलेश पाटील यांनी केले.

शिवस्वराज्य दिन साजरा

Image
 राधानगरी महाविद्यालय राधानगरी येथे शिवस्वराज्य दिन साजरा. दिनांक 6 जून 2022 रोजी सकाळी नऊ वाजता राधानगरी महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी.एस. मोरुस्कर सर  होते.  प्रो.डॉ. वसंत ढेरे यांनी स्वराज्य ही कल्पना विशद करून शहाजी महाराज यांनी स्वराज्यसंकल्पना कशी वापरली हे सांगितले. जिजाबाईनी या स्वराज्य संकल्पनेसाठी कशी पायाभरणी केली हे सांगितले. छत्रपती शिवरायांनी लहानपणापासून केलेला संघर्ष आणि त्या पाठी मागची प्रेरणा स्वराज्य या बाबी सविस्तरपणे मांडल्या. स्वराज्याचे विरोधक त्यांच्याकडे असलेले सैन्य आणि स्वराज्याचे पाईक सैनिक शिबंदी या बाबी सविस्तरपणे सांगून राज्याभिषेकाचे महत्त्व राज्याभिषेका मुळे नवीन निर्माण झालेल्या बाबी आणि राज्याभिषेकाचे  परिणाम याविषयी सविस्तर माहिती दिली.   कार्यक्रमाचे स्वागत प्रा. संग्राम पाटील यांनी केले. डॉ. विश्वास पाटील कौलवकर यांनी प्रास्ताविक केले.आभार प्रा. प्रकाश कांबळे यांनी मानले. प्रा. एकल के. वाय. यांनी सूत्रसंचालन केले.

आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्त्व स्पर्धेत महाविद्यालयाचे यश

Image
 दि. ३०मे २०२२ रोजी दुध-साखर महाविद्यालय, बिद्री  येथे  आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्त्व स्पर्धेत महाविद्यालयाच्या कु. सविता चौगले (बी.ए. २) आणि कु. साऊताई बोभाटे (बी. कॉम. २) या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. सदर स्पर्धेत कु. सविता चौगले हिला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. सदर स्पर्धेसाठी विद्यार्थिनीना प्रा. बी. के. पाटील आणि प्रा. पी. ए. मोकाशी यांनी विशेष मार्गदर्शन केले.  पारितोषिक स्वीकारताना कु. सविता चौगले

आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्त्व स्पर्धेत महाविद्यालयाचे यश

Image
 दि. ०६ मे २०२२ रोजी तुकाराम कृष्णाजी कालेकर कला-वाणिज्य महाविद्यालय, नेसरी येथे राजर्षी शाहू जन्मशताब्दीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्त्व स्पर्धेत महाविद्यालयाच्या कु. सविता चौगले (बी.ए. २) आणि कु. साऊताई बोभाटे (बी. कॉम. २) या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. सदर स्पर्धेत कु. साऊताई बोभाटे हिला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. सदर स्पर्धेसाठी विद्यार्थिनीना प्रा. बी. के. पाटील आणि प्रा. पी. ए. मोकाशी यांनी विशेष मार्गदर्शन केले. 

कै. शंकरराव पाटील कौलवकर स्मृती दिन संपन्न

Image
बुधवार दि. ०९ फेब्रुवारी २०२२ रोजी महाविद्यालयामध्ये  श्री राधानगरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष  कै. शंकरराव पाटील कौलवकर यांचा स्मृती दिन संपन्न झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात डॉ. व्ही. डी. ढेरे, डॉ. इ. एस. पाटील यांनी शंकरराव पाटील कौलवकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. संस्थेचे उपाध्यक्ष श्री मोहन नेवडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. व्ही. एस. पाटील यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. एन. ए. जरंडीकर यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.  

प्रजासत्ताक दिन संपन्न

Image
 भारतीय संघराज्याचा ७३ वा प्रजासत्ताक दिन महाविद्यालयाच्या प्रांगणात दि. २६ जानेवारी २०२२ रोजी संपन्न झाला. यावेळी राधानगरी महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच राधानगरी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. ध्वजारोहण विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आर. डी. कांबळे यांचे हस्ते झाले.