आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्त्व स्पर्धेत महाविद्यालयाचे यश
दि. ३०मे २०२२ रोजी दुध-साखर महाविद्यालय, बिद्री येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्त्व स्पर्धेत महाविद्यालयाच्या कु. सविता चौगले (बी.ए. २) आणि कु. साऊताई बोभाटे (बी. कॉम. २) या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. सदर स्पर्धेत कु. सविता चौगले हिला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. सदर स्पर्धेसाठी विद्यार्थिनीना प्रा. बी. के. पाटील आणि प्रा. पी. ए. मोकाशी यांनी विशेष मार्गदर्शन केले.
पारितोषिक स्वीकारताना कु. सविता चौगले |
Comments
Post a Comment