कै. शंकरराव पाटील कौलवकर स्मृती दिन संपन्न
बुधवार दि. ०९ फेब्रुवारी २०२२ रोजी महाविद्यालयामध्ये श्री राधानगरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष कै. शंकरराव पाटील कौलवकर यांचा स्मृती दिन संपन्न झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात डॉ. व्ही. डी. ढेरे, डॉ. इ. एस. पाटील यांनी शंकरराव पाटील कौलवकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. संस्थेचे उपाध्यक्ष श्री मोहन नेवडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. व्ही. एस. पाटील यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. एन. ए. जरंडीकर यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment