शिवस्वराज्य दिन साजरा
राधानगरी महाविद्यालय राधानगरी येथे शिवस्वराज्य दिन साजरा.
दिनांक 6 जून 2022 रोजी सकाळी नऊ वाजता राधानगरी महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी.एस. मोरुस्कर सर होते.
प्रो.डॉ. वसंत ढेरे यांनी स्वराज्य ही कल्पना विशद करून शहाजी महाराज यांनी स्वराज्यसंकल्पना कशी वापरली हे सांगितले. जिजाबाईनी या स्वराज्य संकल्पनेसाठी कशी पायाभरणी केली हे सांगितले. छत्रपती शिवरायांनी लहानपणापासून केलेला संघर्ष आणि त्या पाठी मागची प्रेरणा स्वराज्य या बाबी सविस्तरपणे मांडल्या. स्वराज्याचे विरोधक त्यांच्याकडे असलेले सैन्य आणि स्वराज्याचे पाईक सैनिक शिबंदी या बाबी सविस्तरपणे सांगून राज्याभिषेकाचे महत्त्व राज्याभिषेका मुळे नवीन निर्माण झालेल्या बाबी आणि राज्याभिषेकाचे परिणाम याविषयी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे स्वागत प्रा. संग्राम पाटील यांनी केले. डॉ. विश्वास पाटील कौलवकर यांनी प्रास्ताविक केले.आभार प्रा. प्रकाश कांबळे यांनी मानले. प्रा. एकल के. वाय. यांनी सूत्रसंचालन केले.
Comments
Post a Comment