महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील तरतुदीनुसार विद्याविषयक लेखापरीक्षणासंदर्भात शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी गठीत केलेल्या समितीने शुक्रवार दि. २२ जून २०२२ इ. रोजी महाविद्यालयास भेट दिली. प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार (विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर) यांनी सदर समितीचे अध्यक्ष म्हणून, तर डॉ. एन. एस. जाधव (श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर) यांनी समिती सदस्य म्हणून काम पहिले. महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. डी. एस. मोरुस्कर, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. एन. ए. जरंडीकर, शिक्षक प्रतिनिधी म्हणून डॉ. व्ही. डी. ढेरे, डॉ. इ. एस. पाटील व प्रा. बी. के. पाटील यांनी आणि प्रशासन प्रतिनिधी म्हणून श्री आर. के. पाटील यांनी संवाद साधला. महाविद्यालयातील भौतिक सुविधा आणि महाविद्यालयाने सदर केलेल्या कागदपत्रांची छाननी करून समितीने आपला अहवाल शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचेकडे सादर केला.
|
प्राचार्य. डॉ. आर. आर. कुंभार यांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ. डी. एस. मोरुसकर |
|
डॉ. एन. एस. जाधव यांचे स्वागत करताना डॉ. एन. ए. जरंडीकर |
|
समितीशी संवाद साधताना प्राचार्य डॉ. डी. एस. मोरुस्कर, डॉ. व्ही. डी. ढेरे, आणि डॉ. इ. एस. पाटील |
Comments
Post a Comment