“ग्रंथ हेच गुरु"
“ग्रंथ हेच गुरु"
'ग्रंथ हेच आपले गुरू असून सर्वांगीण विकासासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही’ असे मत राधनागरी महाविद्यालय, राधनागरीचे ग्रंथपाल श्री कुंभार के एम यांनी व्यक्त केले. ते गुरूवार दि. १३ आॅगस्ट २०२० रोजी महाविद्यालयात संपन्न झालेल्या ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर.रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. व्यक्तिच्या जीवनात गुरुचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. जन्मतः आई ही गुरु असते, त्यानंतर शाळा,काॅलेज मधील शिक्षक हे गुरु असतात. आणि तिसरा गुरु म्हणून ग्रंथांचा उल्लेख करावा लागतो. सध्याच्या काळात इंटरनेटच्या सोयीमुळे पुस्तक वाचन खूपच कमी झालेचे दिसून येते. इंटरनेट च्या माध्यमातून ग्रंथाचा आवश्यक तेवढ्याच भागाचे वाचन केले जाते त्यामुळे किती तरी उपयुक्त माहितीपासून वाचक वंचित राहातो. ग्रंथवाचनामुळे व्यक्ती वैचारिक स्वावलंबी होते. असे प्रतिपादन के.
एम. कुंभार यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डाॅ.एकनाथ पाटिल होते. प्रा. डॉ. एकनाथ पाटिल यांच्या हस्ते डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास प्रा. डॉ नितिन जरंडीकर, प्रा ए एम कांबळे , प्रा के एस पोवार ,एम जी कांबळे ,नरेंद्र नेवड़े अनिल कांबळे, लिपिक आर के पाटिल, दिलीप सूर्यवंशी व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment