प्रजासत्ताक दिन संपन्न
श्री राधानगरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राधानगरी विद्यालय, राधानगरी उच्च माध्यमिक विद्यालय आणि राधानगरी महाविद्यालय, राधानगरी यांच्यावतीने मंगळवार दि. २६ जानेवारी २०२१ रोजी ७२वा प्रजासत्ताक दिन महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न झाला. यावेळी कोव्हीड आणि लॉकडाऊनच्या काळात अथक प्रयत्न करणारे कोव्हीड योद्धे राधानगरी ग्रामीण रुग्णालय, राधानगरीचे अधीक्षक डॉ. जी. बी. गवळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. रणधीर कांबळे, प्राचार्य डॉ. डी एस मोरुस्कर, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment