राधानगरी महाविद्यालयामध्ये मराठी भाषा दिन साजरा

राधानगरी ता.२७: ‘जागतिकीकरण आणि त्यापाठोपाठ झालेले तंत्रज्ञानाचे आक्रमण यामध्ये असंख्य भाषा होरपळून निघत असल्या तरी मराठी भाषा या साऱ्याला पुरून उरणारी आहे’, असे गौरवोद्गार कथाकार मा. मारुती मांगोरे यांनी राधानगरी महाविद्यालय, राधानगरी येथे संपन्न झालेल्या मराठी भाषा दिन प्रसंगी काढले.
आज दिनांक २७ फेब्रुवारी २०२१ रोजी राधानगरी महाविद्यालयामध्ये 'मराठी भाषा दिन' संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. या वेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे वाचन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. व्ही. डी. ढेरे हे होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. बी. के पाटील यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील यांनी करुन दिला.
संग्रामसिंह पाटील यांनी आभार मानले, सुञसंचालन प्रा जे डी इंगवले यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कोव्हीड महामारीच्या पार्श्वभूमीवर मास्क सक्ती, सॅनिटायझर वापर आणि सोशल डिस्ट्न्सिंग या नियमांचे पालन करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

राधानगरी महाविद्यालयास नॅककडून बी प्लस ग्रेड प्रदान

प्रजासत्ताक दिन संपन्न

नॅक पिअर टीमची महाविद्यालयास भेट