राधानगरी महाविद्यालय, राधानगरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

 राधानगरी महाविद्यालय, राधानगरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि अंतर्यागत तक्रार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने  आज शुक्रवार,दि. ८ ऑक्टोबर २०२१ रोजी  सायबर गुन्हेगारी या विषयावर  श्रीमती अनुराधा पाटील पोलीस उपनिरीक्षक राधानगरी यांचे व्याख्यान आयोजित केले होते. आपल्या मनोगतात बोलताना अनुराधा पाटील म्हणाल्या, सायबर विषयक गुन्हे हे कधीही माणसाला फसवू शकतात,गुन्हात अडकवू शकतात विशेष करून मुलींनी मोबाईल वापरताना व्हाट्स अॅप असेल, इंस्टाग्राम असेल अथवा आणखी कोणतेही ॲप्स असेल तर अशा अॅपचा वापर करताना काळजीपूर्वक विचार करुन करावा हे ॲप्स खूप उपयुक्तही आहेत तेवढेच धोकादायक आहेत. त्यामुळे त्याचा वापर करताना समजून-उमजून करावा आणि सायबर गुन्हा च्या माध्यमातून खूप मोठी फसवणूक केली जाते असा विचार त्यांनी मांडला. त्याचबरोबर स्त्रियांचे कायदे स्त्रियांचे हक्क स्त्रियांच्या चळवळी याविषयी बोलताना त्यांनी स्त्री कायद्यातील   मुद्द्याच्या आधारे स्त्रीला न्याय मागता येऊ शकतो. स्त्री दुबळी नाही स्त्री सक्षम आहे. या अनुषंगाने आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात प्रा. ऐश्वर्या पालकर म्हणाल्या, स्त्रियांनी  स्वत्वाची ओळख करून घेणे गरजेचे आहे, त्याचबरोबर स्त्रियांनी आत्मसन्मान जपला पाहिजे. आपल्या कायद्यांची चळवळींच्या आपण माहिती करून घेतली पाहिजे. त्यासाठी एखाद्या प्रसंगी संघर्ष करावा लागला तरीही संघर्षाची तयारी करावी. स्त्री म्हणजे नटणे, मुरडणे एवढेच नाही तर स्त्री नवदुर्गा सुद्धा बनू शकते. आणि समाजाला सुरळीतपणे नीट करू शकते. असा विचार त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. डॉ. विश्वास पाटील यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रा कृष्णा एकल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी प्रा.डॉ.नितीन जरंडीकर प्रा.बी.के.पाटील,ए. एम कांबळे, डॉ. एकनाथ पाटील आदी उपस्थित होते. प्रा.ज्योती इंगवले प्रा.संग्राम पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.




Comments

Popular posts from this blog

राधानगरी महाविद्यालयास नॅककडून बी प्लस ग्रेड प्रदान

राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात संपन्न

प्रजासत्ताक दिन संपन्न