अल्पसंख्यांक दिन संपन्न
आज दिनांक 18 डिसेंबर 2020 हा दिवस राधानगरी महाविद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिन म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. वसंत ढेरे हे होते. प्रा. के. वाय. एकल यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना प्रमुख वक्ते डॉ. विश्वास पाटील कौलवकर यांनी पार्श्वभूमी विशद करून अल्पसंख्यांक समाजाला न्याय हक्क कसे मिळवून देता येतील याविषयी विवेचन केले. अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. वसंत ढेरे यांनी भारतातील विविध अल्पसंख्यांक समाज त्यांची परिस्थिती आणि त्यांची न्याय हक्क याबद्दल जागरूक राहिले पाहिजे असे विवेचन केले. कार्यक्रमाचे आभार ग्रंथपाल प्रा. के. एम. कुंभार यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments
Post a Comment