माजी विद्यार्थी मेळावा महाविद्यालयांमध्ये संपन्न

माजी विद्यार्थी  मेळावा  महाविद्यालयांमध्ये संपन्न


राधानगरी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आज दि. 23 /10 /2021 इ. रोजी महाविद्यालयांमध्ये संपन्न झाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ वसंत ढेरे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. विश्वास पाटील यांनी केले.

             या वेळी बोलताना प्रा. डॉ. ढेरे म्हणाले, महाविद्यालयीन जीवन जगत असताना आलेल्या अनुभवाची शिदोरी बरोबर घेऊन महाविद्यालयाच्या बाहेरचे जग जगताना या महाविद्यालयातील  संस्काराची शिदोरी बरोबर असल्याने संस्कारशील समाज निश्चित घडतो. या संस्कारशील विद्यार्थ्यां कडूनच भावी समाज सुसंस्कृत होतो. तसेच माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे वेळोवेळी लक्ष दिले तर आपल्या मागील पिढीलाही या शिदोरीचा  वाटा निश्चित मिळेल. तसेच इंग्रजीचे डॉ. नितीन जरंडीकर बोलताना म्हणाले,राधानगरी परिसराच्या विकासाच्या दिशेने जाताना इथल्या पर्यावरणाचा होत असणारा र्‍हास, इथल्या स्थानिक लोकांचे प्रश्न, समस्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जाणून घेऊन आपल्या शिक्षणाचा उपयोग इथल्या प्रत्येक समस्येकडे लक्ष देण्यासाठी करावा आणि सुजलाम-सुफलाम भारताबरोबर हा तालुका सुद्धा सुजलाम सुफलाम बनवावा असे आव्हान केले. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अमरेंद्र मिसाळ यांनी महाविद्यालयातल्या जीवन अनुभवाची शिदोरी आम्ही बरोबर घेऊनच जगत आहोत. प्रत्येक क्षणी आम्हाला इथल्या मिळालेल्या शैक्षणिक जीवनाचा अनुभव समाजामध्ये निश्चित उपयोगी पडतो. असे सांगितले तसेच त्यांनी माजी विद्यार्थी संघाच्या वतीने महाविद्यालयास तीन फिल्टर आणि टेंपरेचर गन देत आहोत असे जाहीर केले. तसेच राकेश केरकर संग्राम पाटील गणेश पाटील इत्यादी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. महाविद्यालयातील  प्रा मोकाशी उपस्थित होते शेवटी प्रा.कृष्णा एकल यांनी आभार मानले.







Comments

Popular posts from this blog

राधानगरी महाविद्यालयास नॅककडून बी प्लस ग्रेड प्रदान

प्रजासत्ताक दिन संपन्न

नॅक पिअर टीमची महाविद्यालयास भेट