।।राधानगरी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय शिक्षण दिन संपन्न ।।

धर्मचिकित्सा करताना समाजाचा रोष नेहमी पत्कारावा लागतो. परंतु अशाही परिस्थितीमध्ये आपला लढा चालू ठेवत शिक्षण आणि समाज सुधारणा यासाठी माैलाना अबुल कलाम आझाद यांनी मोठे योगदान दिल्याचे उद्गार डाॅ. विश्वास पाटील काैलवकर यांनी काढले. ते राधानगरी महाविद्यालयामध्ये संपन्न झालेल्या राष्ट्रीय शिक्षण दिन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ. व्ही. डी. ढेरे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात डाॅ. ढेरे यांनी माैलाना आझाद यांच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाबरोबरीने त्यांच्या शिक्षणविषयक विचारांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. एन् ए. जरंडीकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन बी. के. पाटील यांनी केले. कार्यक्रमाला ग्रंथपाल के. एम्. कुंभार, पी. ए. मोकाशी, के. वाय. एकल, आर. के. पाटील, ए. पी. कांबळे व महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कोवीड पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

पी.सी.: के. वाय. एकल





Comments

Popular posts from this blog

राधानगरी महाविद्यालयास नॅककडून बी प्लस ग्रेड प्रदान

राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात संपन्न

प्रजासत्ताक दिन संपन्न