महाविद्यालयामध्ये शिक्षक दिन संपन्न
झपाट्याने बदलणाऱ्या समाजव्यवस्थेमध्ये शिक्षकांची जबाबदारी मोठी असल्याचे प्रतिपादन प्रा. बी. के. पाटील यांनी महाविद्यालयात संपन्न झालेल्या शिक्षक दिनावेळी केले. डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतींना उजाळा देताना त्यांनी डाॅ राधाकृष्णन भारताचे राष्ट्रपती तसेच उपराष्ट्रपती होते; त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा विद्यार्थांनी व्यक्त केली तेव्हापासून ५सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो; त्यांचा तत्वज्ञान शिकविण्यात हातखंडा असल्याने राधाकृष्णन विद्यार्थीप्रिय शिक्षक होते इत्यादी गोष्टींचा उहापोह केला.
या कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालय हाॅलमध्ये करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डाॅ एकनाथ पाटील(हिंदी विभाग प्रमुख)यांनी केले. कार्यक्रमात प्रा. पी. ए. मोकाशी , प्रा एस आर सावंत यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रतिमा पूजन प्रा.डाॅ. एकनाथ पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डाॅ एन ए जरंडीकर होते. आभार ग्रंथपाल के एम कुंभार यांनी मानले, तर सुञसंचालन प्रा. संग्रामसिंह पाटील यांनी केले. कार्यक्रम शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थित संपन्न झाला.
(पी.सी.
Sangramsinh Patil
)
Comments
Post a Comment