राधानगरी महाविद्यालयाचे डाॅ. विश्वास पाटील यांची अभिनंदनीय निवड!

 मराठा सेवा संघ महाराष्ट्र संचलित जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र या संत तुकोबाराय साहित्य व विचार परिषदेच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी राधानगरी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. विश्वास शंकरराव पाटील यांची निवड झाली. या निवडीबद्दल डॉ. विश्वास पाटील कौलवकर यांचा सत्कार समारंभ राधानगरी महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक डॉ. वसंत ढेरे यांनी केले. सत्कार मूर्ती डॉ. विश्वास पाटील यांचा सत्कार शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर चे डीन व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस्. मोरुस्कर सर यांच्या हस्ते शाल-श्रीफळ व फेटा बांधून आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डाॅ. विश्वास पाटील यांनी तूकोबाराय परिषदेची भूमिका आणि तुकोबांच्या विचारांची आजच्या काळामध्ये असणारी गरज याविषयी आपले विचार मांडले.कार्यक्रमाचे आभार डॉ. नितीन जरंडीकर सर यांनी मानले. महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.




Comments

Popular posts from this blog

राधानगरी महाविद्यालयास नॅककडून बी प्लस ग्रेड प्रदान

राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात संपन्न

प्रजासत्ताक दिन संपन्न