प्राचार्य डॉ. डी.एस. मोरूस्कर यांची शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या व्यवस्थापन परिषद सदस्यपदी अभिनंदनीय निवड!

 राधानगरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एस. मोरूस्कर सर यांची शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर च्या व्यवस्थापन परिषद सदस्य पदी निवड झाली. याबद्दल आज दिनांक २१ सप्टेंबर २०२० रोजी राधानगरी महाविद्यालयाच्या ग्रंथालय हॉलमध्ये श्री राधानगरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ राधानगरी चे कार्याध्यक्ष माननीय सुशील शंकराराव पाटील कौलवकर यांच्या हस्ते फेटा बांधून, शाल ,श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा.डॉ. विश्वास पाटील कौलवकर यांनी केले. संस्थेचे कार्याध्यक्ष मा. सुशील पाटील कौलवकर यांनी माझे वडील शंकरराव पाटील कौलवकर यांनी दुर्गम भागात सुरू केलेल्या या महाविद्यालयाचे रूपांतर वटवृक्षात होत असताना त्याचेच फलित म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. मोरूस्कर सर यांची पहिल्यांदा विद्याशाखा अधिष्ठाता म्हणून शिवाजी विद्यापीठात निवड झाली. आता शिवाजी विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलच्या सन्माननीय सदस्यपदी निवड झाली ही संस्थेच्या व महाविद्यालयाच्या दृष्टीने निश्चितच कौतुकास्पद गोष्ट आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ. मोरूस्कर सर यांनी महाविद्यालयाच्या स्टाफचे व संस्थेचे सहकार्य नेहमीच माझ्या पाठीशी राहिले व त्या प्रेरणेतूनच मला अधिक कार्य करण्याची ऊर्जा मिळाली. यापुढेही अशीच उत्तमोत्तम कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न राहील असे प्रतिपादन केले.
यावेळी राधानगरी विद्यालयाचे शिक्षक दीपक पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. वसंत ढेरे यांनी भूषविले कार्यक्रमाचे आभार डॉ. नितीन जरंडीकर सर यांनी मानले. यावेळी महाविद्यालय व विद्यालयाचा सर्व टीचिंग, नॉन टीचिंग स्टाफ उपस्थित होता. सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम यावेळी पाळण्यात आले.



Comments

Popular posts from this blog

राधानगरी महाविद्यालयास नॅककडून बी प्लस ग्रेड प्रदान

राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात संपन्न

प्रजासत्ताक दिन संपन्न