।।राधानगरी महाविद्यालय, राधानगरी येथे वाचन प्रेरणा दिन संपन्न।।
भारताचे माजी राष्ट्रपती मा. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आज दिनांक १५/१०/२०२० रोजी राधानगरी महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. विश्वास पाटील कौलवकर सर यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष. राधानगरी महाविद्यालय राधानगरी चे प्रभारी प्राचार्य डॉ. वसंत ढेरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनानंतर प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रा. जयवंत सुतार. प्र. प्राचार्य पार्वतीबाई मोरे महिला महाविद्यालय सरवडे यांनी ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला व जीवनातील वाचनाचे महत्त्व समजावून सांगितले
Comments
Post a Comment