“डॉक्टरांनी सेवाभावी वृत्ती जपावी” – डॉ. अरूण कणबरकर
“डॉक्टरांनी सेवाभावी वृत्ती जपावी” – डॉ. अरूण कणबरकर
डॉक्टर लोकांनी रोग्याच्या आरोग्याशी खेळ न करता सेवाभावी वृत्तीने समाजातील लोकांची सेवा करावी असे प्रतिपादन दि. ०१जुलै २०१९ रोजी महाविद्यालयात संपन्न झालेल्या डॉक्टर्स डेच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. अरूण कणबरकर यांनी केले. राधानगरी महाविद्यालय व कै रेवताबाई एकावडे ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढे डॉ. कणबरकर म्हणाले, “काळ,वेळ, भान या गोष्टीना महत्व देवून एखादा जीव आपल्या हातून वाचला तर त्याच्यासारखे समाधान आयुष्यात कोणतेही नसते तोच आनंद डॉक्टर लोकांच्या चेहऱ्यावर खुलून दिसतो.” कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एस.मोरूस्कर सर होते. अध्यक्षीय भाषणात डॉ. मोरूस्कर सर यांनी डॉक्टर लोकांनीही पेशंटच्या आरोग्याबरोबर स्व:ताचेही आरोग्य सांभाळावे असा सल्ला दिला. या कार्यक्रमासाठी डॉ. टी.आर.पाटील, डॉ. काळेबेरे, डॉ. कुंभार, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत प्रा. डॉ. विश्वास पाटील यांनी केले, आभार प्रा.सौ.पालकर यांनी मांडले.
Comments
Post a Comment