‘स्थानिक इतिहास’ विषयावरील कार्यशाळा संपन्न
‘स्थानिक इतिहास’ विषयावरील कार्यशाळा संपन्न
कार्यक्रमाच्या पहिल्या उद्घाटनाच्या सत्रात राधानगरी ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य रणधीर कांबळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. डॉ. वसंत ढेरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या दुसर्या सत्रात डॉ. सुरेश शिखरे इतिहास विभाग प्रमुख छत्रपती शहाजी महाविद्यालय कोल्हापूर यांनी “स्थानिक इतिहास” ही संकल्पना स्पष्ट करून इतिहासाच्या विविध व्याख्या सांगितल्या. इतिहासाचे विविध प्रकार सांगून स्थानिक इतिहास ही संकल्पना स्पष्ट केली. देशाच्या राज्याच्या जिल्ह्याच्या इतिहासात स्थानिक इतिहास किती मौलिक कार्य करू शकतो याबद्दल माहिती दिली. लोकगीते, म्हणी, प्रवाद याबद्दल माहिती देऊन सण परंपरा उत्सव यांचे स्थानिक इतिहासातील महत्त्व अधोरेखित केले.
या सत्राच्या अध्यक्षपदावरून प्रा. सुनील सावंत यांनी राधानगरीच्या स्थानिक इतिहासाबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रात प्रा. डॉ. संजय नवले (श्री संत गाडगेबाबा महाविद्यालय, कापशी तालुका सरूड) यांनी वस्तुसंग्रहालयामध्ये दिसणाऱ्या वस्तूंमधून स्थानिक इतिहास कशाप्रकारे शोधता येतो याबद्दल मार्गदर्शन केले. अनेक ऐतिहासिक स्थळे वास्तू उत्सव परंपरा यातून स्थानिक इतिहास कशा प्रकारे लिहिला जातो तो लिहिण्याची शास्त्रशुद्ध पद्धती याबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे आभार या कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. वसंत ढेरे इतिहास विभाग प्रमुख राधानगरी महाविद्यालय राधानगरी यांनी मानले.
Comments
Post a Comment