लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुण्यदिन
राधानगरी महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुण्यदिन संपन्न
राधानगरी महाविद्यालयाच्या ग्रंथालय सभागृहामध्ये दि ०१ ऑगस्ट २०१९ रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुण्यदिनाचे आयोजन करणेत आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.बी.के पाटील हे होते. ते म्हणाले “अण्णाभाऊंनी आपल्या कादंबरी मधून बलुतेदारी,गावकी आणि जात संपवण्याचा प्रयत्न केला. अशा या महामानवाचे स्मरण करणे हा या कार्यक्रमाचा हेतू आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राध्या.डॉ .विश्वास पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ डी.एस.मोरुस्कर होते. सूत्रसंचालन प्रा. जे.डी.इंगवले यांनी केले. व आभार प्रा. एकनाथ पाटील यांनी मानले. सदर कार्यक्रमास प्रा.पी.ए.मोकाशी, ग्रंथपाल के.एम.कुंभार, प्रा, कृष्णा एकल, इत्यादी उपस्थित होते. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाचा समारोप करणेत आला.
Comments
Post a Comment