महाविद्यालयामध्ये “वन वन्यजीव आणि जैवविविधता संवर्धन व संरक्षण” विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

 महाविद्यालयामध्ये “वन वन्यजीव आणि जैवविविधता संवर्धन व संरक्षण” विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा संपन्न



राधानगरी महाविद्यालय,राधानगरी व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत वन, वन्यजीव आणि जैवविविधता संवर्धन व संरक्षण या विषयावर दि.०३-१०-२०१९ रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर एक दिवसीय कार्यशाळेसाठी प्रथम सत्रासाठी प्रमुख वक्ते म्हणून मा.सत्यजित गुर्जर (वन संरक्षक तथा क्षेत्रसंचालक सह्याद्री व्याघ्रःप्रकल्प, कोल्हापूर) हे होते. तर दुसऱ्या सत्रात श्री अनिल जेरे सहा. वन संरक्षक वन्यजीव, कोल्हापूर हे होते. तर कार्यशाळेचे अध्यक्ष डॉ. व्ही. डी. ढेरे (इतिहास प्रमुख राधानगरी महाविद्यालय, राधानगरी) हे होते.
प्रमुख व्याख्याते मा. सत्यजित गुर्जर (वन संरक्षक तथा क्षेत्रसंचालक सह्याद्री व्याघ्रःप्रकल्प, कोल्हापूर) यांनी राधानगरी अभयारण्यासंदर्भात संपूर्ण माहिती दिली. त्याचबरोबर पश्चिमघाट, अतिसंवेदनशील क्षेत्रासंदर्भात तसेच बफर झोन, आयुर्वेदिक वनस्पतीं आदीबद्दलही माहिती दिली.
दुसऱ्या सत्रात मा.अनिल जेरे यांनी जंगल आणि जंगल विषयक कायदे या संदर्भात मार्गदर्शन केले. त्याचबरोबर वन्यजीव राधानगरीचे वन क्षेत्रपाल श्री. नवनाथ कांबळे यांनी जंगली प्राण्यांचा मानवी वस्तीत हस्तक्षेप यासाठी घेणेची काळजी या संदर्भात मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. विश्वास पाटील यांनी केले. कार्यशाळेचे समन्वयक प्रा. फयाज मोकाशी यांनी वन, वन्यजीव आणि जैवविविधता संवर्धन व संरक्षण हा कार्यशाळेचा विषय निवडण्याचे कारण व त्याचे महत्व स्पष्ट करून प्रमुख वक्ते यांचा परिचय करून दिला.
सदर कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थींनी उपस्थित होते. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ व वन्यजीव विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. शेवटी आभार प्रा. संग्रामसिंह पाटील यांनी मानले आणि कार्यशाळा संपन्न झाली..

Comments

Popular posts from this blog

राधानगरी महाविद्यालयास नॅककडून बी प्लस ग्रेड प्रदान

राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात संपन्न

प्रजासत्ताक दिन संपन्न