महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

 महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न



राधानगरी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन बुधवार दि. ११ मार्च २०२० ई. रोजी संपन्न झाले. सकाळी 09 ते 10 या वेळेमध्ये विद्यार्थी-विद्यार्थ्यीनीनी फनी गेम्स हा खेळ खेळण्याचा आनंद घेतला. सकाळी 10 ते 11.15 या वेळेत सर्वांना अल्पोपहार देण्यात आला. सकाळी 11.30 ते 12 या वेळेत शेलापागोटे हा कार्यक्रम आयोजित केला गेला. शेलापागोटे वाचन प्रा. बी. के. पाटील, प्रा. विश्वास पाटील, प्रा. ज्योती इंगवले, प्रा. एकनाथ पाटील यांनी केले.

या नंतर विविध क्षेत्रात प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थ्यीनीना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार प्राचार्य. डी. एस. मोरुसकर, प्रा. नितिन जरंडीकर, प्रा. व्ही. डी. ढेरे, प्रा. बी. के. पाटील, प्रा. एकनाथ पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. एकनाथ पाटील यांनी केले. अहवाल वाचन प्रा. नीलेश पाटील यांनी केले. या कार्यक्रमात प्रा. ए. एम. कांबळे व पंचायत समितीचे उप अभियंता अमित पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डी. एस. मोरुस्कर होते. आभार प्रा. बी. के. पाटील यांनी मांडले व सूत्रसंचालन प्रा. व्ही. एस. पाटील यांनी केले. अशाप्रकारे पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
यानंतर विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्टेज गीते, रेकॉर्ड डान्स, नकला, विनोदी बातम्या, कविता वाचन इत्यादी कला प्रकार सादर केले. हा कार्यक्रम 01ते 03 या वेळेत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आभार प्रा. एकनाथ पाटील यांनी मांडले.

Comments

Popular posts from this blog

राधानगरी महाविद्यालयास नॅककडून बी प्लस ग्रेड प्रदान

राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात संपन्न

प्रजासत्ताक दिन संपन्न