राधानगरी महाविद्यालयामध्ये राजर्षी शाहू जयंती कार्यक्रम संपन्न
राधानगरी महाविद्यालयामध्ये राजर्षी शाहू जयंती कार्यक्रम संपन्न
राजर्षी शाहू यांनी साथीच्या रोगात रयतेची घेतलेली पुरेपूर काळजी हा आजच्या राजकारण्यांसाठी एक उत्तम वस्तुपाठ आहे, असे उद्गार डाॅ. वसंत ढेरे यांनी काढले. दिनांक 26 जुलै 2020 रोजी राधानगरी महाविद्यालय ग्रंथालय हॉलमध्ये संपन्न झालेल्या राजर्षी शाहू महाराज जयंती कार्यक्रमावेळी ते बोलत होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य, वसतिगृह निर्मिती, जलव्यवस्थापन, राखीव वनसंपदा, औद्योगिक विकास, सामाजिक परिवर्तन व त्यासाठी जातीअंताची लढाई या बाबींचा आढावा घेतला. सध्याच्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी साथीच्या वेळी केलेली उपाय योजना सांगून तत्कालीन अज्ञानी समाजासमोर स्वतः लस घेऊन इतरांना लस घेण्यास प्रवृत्त केले, त्त्यामुळे कोल्हापूर राज्यात मरणाऱ्यांची संख्या कमी झाली याचाही उल्लेख केला गेला.
प्रा. बाजीराव पाटील यांनी शाहू महाराजांच्या आठवणी सांगितल्या. डॉ. विश्वास पाटील यांनी कोल्हापूर राज्याच्या व शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी राजर्षी शाहू महाराजांनी केलेले कार्य विस्तृतपणे मांडले.
कार्यक्रमाचे स्वागत डॉक्टर विश्वास पाटील कौलवकर यांनी केले तर प्रास्ताविक प्रा सुनील सावंत यांनी केले. दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन इतिहास विभाग प्रमुख डॉ. वसंत ढेरे यांनी केले. लॉक डाऊनच्या काळात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सोशल डिस्टंसिंगचे पुरेपूर पालन करण्यात आले. प्रा.के. वाय. एकल यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.
Comments
Post a Comment