राधानगरी महाविद्यालयात मराठी भाषा दिन साजरा

                                         राधानगरी महाविद्यालयात मराठी भाषा दिन साजरा


(फोटोमध्ये मराठी भाषा दिन प्रसंगी दीपप्रज्वलन करताना कवी मा.राजेंद्रकुमार पाटील. सोबत डॉ. एन. ए. जरंडीकर, कवी मा. विक्रम वागरे, कवी मा. मारुती मांगोरे आणि प्रा. बी. के. पाटील)


मराठी भाषा दिन साजरा करताना मराठीतील प्रतिभावंत लेखक, समीक्षक, कादंबरीकार, परिवर्तनाचे पुरोगामी विचार मांडणारे विद्रोही साहित्यक यांच्या साहित्यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे असे मत कवी मा.राजेंद्रकुमार पाटील यांनी व्यक्त केले. ते राधानगरी महाविद्यालय,राधानगरी येथे दि.२७-०२-२०२० रोजी संपन्न झालेल्या मराठी भाषा दिन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे दुसरे पुष्प गुंफतांना प्रमुख अतिथी कवी विक्रम वागरे यांनी ‘कवी भोवताल सुक्ष्मपणे अभ्यासत असतो व त्याचे सचित्र आपल्या काव्यात गुंफतो’ अशा आशयाचे उद्गार काढले. प्रमुख अतिथींच्या मनोगतानंतर कविसंमेलन संपन्न झाले. कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन कवी मा.मारुती माने यांनी केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.बी.के.पाटील यांनी केले. कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.राजेंद्रकुमार पाटील यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. नितीन जरंडीकर होते.कार्यक्रमास प्रा. पी. ए. मोकाशी, ग्रंथपाल के. एम. कुंभार व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रा. संग्रामसिंह पाटील यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. जे. डी. इंगवले यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

राधानगरी महाविद्यालयास नॅककडून बी प्लस ग्रेड प्रदान

राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात संपन्न

प्रजासत्ताक दिन संपन्न