राधानगरी महाविद्यालयात पारंपरिक दिन उत्साहात साजरा
राधानगरी महाविद्यालयात पारंपरिक दिन उत्साहात साजरा
राधानगरी महाविद्यालयाच्या ग्रंथालय सभागृहामध्ये दि.१६ जानेवारी २०२० रोजी पारंपारिक वेशभूषा दिन व मकरसंक्राती निमिती तिळगूळ वाटप कार्यक्रम व त्याच बरोबर विद्यार्थ्यांनि गायन,नकला व रेकॉर्ड डान्स अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. बी के पाटील यांनी केले.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे प्रा,डॉ.एन.ए.जरंडीकर होते ते म्हणाले “तिळात स्निग्धता व गुळातील गोडवा आपल्या जीवनात आणण्याच्या प्रयत्न करा जीवन सुंदर बनेल हाच तर या सणाचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ डी.एस.मोरुस्कर होते.ते म्हणाले अशा सणा-उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येतो.एकमेकांचे विचार आदान प्रदान करतो.हा या कार्यक्रमाचा हेतू आहे.
सदर कार्यक्रमामध्ये अनेक पारंपारिक वेशभूषा परिधान केल्या होत्या.तसेच गायन ,नकलाव रेकॉर्ड डान्स अशा कार्यक्रमाचे सादरीकरण केले. सूत्रसंचालन प्रा. जे.डी.इंगवले यांनी केले. तर आभार प्रा. संग्रामसिंह पाटील यांनी मानले. सदर कार्यक्रमास प्रा.पी.ए.मोकाशी,ग्रंथपाल के.एम.कुंभार ,प्रा.डॉ.एकनाथ पाटील , प्रा. कृष्णा एकल ,इत्यादी उपस्थित होते. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाचा समारोप करणेत आला.
Comments
Post a Comment