राधानगरी महाविद्यालय पदवीदान समारंभ संपन्न
राधानगरी महाविद्यालय पदवीदान समारंभ संपन्न
महाविद्यालयाचा द्वितीय पदवीदान समारंभ आज दिनांक ०२ मार्च २०२० रोजी संपन्न झाला. समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रथितयश साहित्यिक आणि राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त लेखक मा. किरण गुरव हे होते. तर विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळाचे सदस्य मा. डॉ. एकनाथ पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते. आपल्या मनोगतामध्ये डॉ. एकनाथ पाटील यांनी विद्यार्थ्यांनी आपली क्षमता ओळखून ध्येयाकडे अखंड वाटचाल करावी असे सांगितले. प्राचार्य डॉ. डी. एस. मोरुस्कर यांनी श्री राधानगरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला. प्रगतीचा अहवाल वाचताना विद्यार्थ्यांसाठी किती सोयी-सवलती येथे उपलब्ध झाल्या यावर भाष्य केले.
या प्रसंगी प्रा. सुनील सावंत (परीक्षा विभाग प्रमुख) यांनी ध्वज वंदना दिली. मिरवणुकीने मान्यवर आणि स्नातक यांचे कार्यक्रम स्थळी आगमन होऊन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. वसंत ढेरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. बाजीराव पाटील यांनी केला. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवीप्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात पसायदानाने झाली तर सांगता राष्ट्रगीताने करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार डॉ. नितीन जरंडीकर सर यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. ज्योती इंगवले यांनी केले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे समन्वयक मा. सुशील पाटील कौलवकर यांनी विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला पत्रकार संजय पारकर, मधुकर किरुळकर,प्रा. के.वाय एकल,प्रा. पी.ए.मोकाशी, के. एम. कुंभार, निलेश पाटील, व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment