“खेळ आणि खेळातील आहाराचे महत्त्व”

                                             “खेळ आणि खेळातील आहाराचे महत्त्व”


दिनांक ०७ फेब्रुवारी २०२० रोजी राधानगरी महाविद्यालय राधानगरी येथे लीड कॉलेज योजनेअंतर्गत “खेळ आणि खेळातील आहाराचे महत्त्व” विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या पहिल्या उद्घाटनाच्या सत्रात प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. एन. डी.पाटील व डॉ.चिन्मय शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा.निलेश पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या दुसर्या सत्रात डॉ.चिन्मय शिंदे (एक्स्पर्ट, स्पोर्ट्स न्यूट्रिशन) यांनी खेळातील आहार आणि त्याचे खेळावर होणारे परिणाम सांगून कोणत्या आहारातून आपल्याला योग्य पोषण मुल द्रव्य मिळतात याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या सत्राच्या अध्यक्षपदी मराठी विभागाचे प्रा. डॉ.विश्वास पाटील होते.
कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रात प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांनी खेळ आणि खेळातील करियर संधी याबद्दल सांगून पदवीच्या पहिल्या वर्षापासूनच एम.पी.एस.सी सारख्या स्पर्धा परिक्षेंची तयारी करण्यास सांगितली आणि खेळाचे या परीक्षासाठी होणार उपयोग सांगितले. या सत्राच्या अध्यक्ष पदी प्रा.डॉ.वसंत ढेरे होते आणि सत्राचे आभार प्रा.संग्राम पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार या कार्यशाळेचे समन्वयक प्रा.निलेश पाटील (जिमखाना विभाग प्रमुख राधानगरी महाविद्यालय राधानगरी) यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

राधानगरी महाविद्यालयास नॅककडून बी प्लस ग्रेड प्रदान

प्रजासत्ताक दिन संपन्न

योग दिवस संपन्न