राधानगरी महाविद्यालयात कै. शंकरराव पाटील कौलवकर स्मृतिदिन साजरा
राधानगरी महाविद्यालयात कै. शंकरराव पाटील कौलवकर स्मृतिदिन साजरा
“परिसराचा विकास हा दृष्टीकोन ठेऊन शंकरराव पाटील यांनी कार्य केले. जिल्हापरिषद नूतन इमारत, जिल्ह्याचा पायाभूत विकास, गैबी बोगदा, राधानगरीचे शैक्षणिक संकुल ही त्यांची चिरंतन स्मारके आहेत,” असे मनोगत डॉ. वसंत ढेरे यांनी दि. ०९ फेब्रुवारी २०२० रोजी महाविद्यालयामध्ये संपन्न झालेल्या श्री राधानगरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक - अध्यक्ष मा. कै. शंकरराव बाळा पाटील कौलवकर यांच्या स्मृतिदिन प्रसंगी व्यक्त केले.
या प्रसंगी प्रा. बी. के. पाटील यांनी “शंकरराव पाटील कौलवकर एक कार्यकुशल नेते होते. त्यांनी प्रतिकूल परीस्थित शिक्षण घेतले. आपल्या शिक्षणाचा समाजाला कसा उपयोग होईल याचा विचार केला” असे सांगून शंकरराव पाटील कौलवकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
कै. शंकरराव पाटील कौलवकर यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री मोहन नेवडे, महाविद्यालयाचा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. एन. ए. जरंडीकर यांनी केले. आभार प्रा. पी. ए. मोकाशी यांनी मानले व सुत्रसंचलन प्रा. जे. डी. इंगवले यांनी केले. कार्यक्रम ग्रंथालय सभागृहात संपन्न झाला.
Comments
Post a Comment