"अकौंटिंग आणि करीअर संधी"

                                                     "अकौंटिंग आणि करीअर संधी"




दि. ३० डिसेंबर २०१९ रोजी राधानगरी महाविद्यालय, राधानगरी येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी "अकौंटिंग आणि करीअर संधी" या विषयावर सेमीनार आयोजित केला होता. सदरच्या सेमीनारसाठी प्रमुख वक्ते रितेश मोरे सरांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख डॉ. एन. ए. जरंडीकर सर यांनी प्रमुख वक्यांची ओळख व प्रास्ताविक मांडले. रितेश मोरे सर हे आय. टॕप करीअर ॲकॕडमीचे संचालक आहेत. या सेमीनारचे अध्यक्षपद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. मोरूस्कर सर यांनी भूषवले. तर या सेमीनारचे सुत्रसंचलन संग्रामसिंह पाटील यांनी केले.

विद्यार्थ्यांना संबोधीत करताना रितेश मोरे सर यांनी बी.ए. अथवा बी. कॉम. नंतर अकौंटिंग क्षेत्रातील करीअर बाबत विस्तृत मार्गदर्शन केले. टॕली आणि ॲप्लाईड टॕली यांचे प्रत्यक्ष काम करताना होणारे उपयोग आणि यासोबतच करीअर घडवण्यासाठी आवश्यक कौशल्यांचा विकास कसा साधावा याबाबत रितेश मोरे सरांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच भविष्यात कोण कोणत्या क्षेत्रात कर्मचाऱ्यांची मागणी वाढणार आहे याचा अभ्यास करून त्या संधीचे रूपांतर करीअरमध्ये कसे करता येईल हा दृष्टिकोन रितेश मोरे सरांनी विद्यार्थ्यांना दिला.
अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. डी. एस. मोरूस्कर सरांनी विद्यार्थ्यांना पदवी नंतरच संघर्ष कसा असतो याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमचे आभार प्रा. जे. डी. इंगवले यांनी मानले. शेवटी सेमीनारची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Comments

Popular posts from this blog

राधानगरी महाविद्यालयास नॅककडून बी प्लस ग्रेड प्रदान

प्रजासत्ताक दिन संपन्न

योग दिवस संपन्न