“तंत्र - जॉब मिळविण्याचे” या विषयावरील सेमिनारचे महाविद्यालयात आयोजन

                 “तंत्र - जॉब मिळविण्याचे” या विषयावरील सेमिनारचे महाविद्यालयात आयोजन



राधानगरी महाविद्यालय, राधानगरी व निलया फौंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. २८-०१-२०२० रोजी तंत्र - जॉब मिळविण्याचे या विषयावर एक दिवसीय सेमिनारचे आयोजन केले होते. या सेमिनार साठी प्रमुख वक्ते म्हणून निलया फौंडेशन, पुणेचे ब्रँड अँबेसेडर डॉ.अविनाश शिरसाठ उपस्थित होते.
या सेमिनारमध्ये डॉ.अविनाश शिरसाठ यांनी कार्पोरेट क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी तयारी कशी करावी. आपण कसे अपडेट असणे गरजेचे आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “ज्याची कॉम्प्यूटरवर कमांड त्यालाच डिमांड; ज्याची इंग्रजीवर कमांड त्यालाच डिमांड” याचे भान विद्यार्थ्यांना येणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी डॉ. अविनाश शिरसाठ यांनी केले.
या सेमिनारच्या सुरूवातीस पाहुणे परिचय-स्वागत प्रास्ताविक डॉ.नितीन जरंडीकर यांनी केले तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. व्ही. डी. ढेरे होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन कु. ज्योती इंगवले तर आभार संग्राम पाटील यांनी मानले. या सेमिनार साठी महाविद्यालयातील ५० विद्यार्थी-विद्यार्थींनी उपस्थित होते.
सेमिनारच्या सुरुवातीस डॉ. अविनाश शिरसाठ यांचे हस्ते ग्रंथालयामध्ये अर्थशास्त्र विभागामार्फत तयार केलेल्या ‘अक्षरगंध’ या भित्तीपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

राधानगरी महाविद्यालयास नॅककडून बी प्लस ग्रेड प्रदान

राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात संपन्न

प्रजासत्ताक दिन संपन्न