राधानगरी महाविद्यालयामधील ऑर्कीड नेचर क्लबच्या सभासदांना मिळाले गाईडचे धडे
राधानगरी महाविद्यालयामधील ऑर्कीड नेचर क्लबच्या सभासदांना मिळाले गाईडचे धडे
दि.१७-१२-२०१९ व १८-१२-२०१९ रोजी राधानगरी वन्यजीव विभागाच्यावतीने घेणेत आलेल्या दोन दिवसीय गाईड प्रशिक्षण कार्यशाळेत राधानगरी अभयारण्यातील युवकांबरोबर महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनीसांठी रोजगार निर्मिती आणि पर्यटनातून निसर्ग सवंर्धनाचे काम करण्यासाठी गाईड प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी होता आले.
या गाईड प्रशिक्षण कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून स्टेट वाईल्ड लाईफ बोर्ड मेंबर मानद वन्यजीव रक्षक श्री. अनुज खरे लाभले. त्यांनी प्रशिक्षणार्थीना निसर्गाची हानी न करता केलेले पर्यटन म्हणजे निसर्ग पर्यटन, निसर्गाचा ऱ्हास न करता पर्यटन करावे व अभयारण्यातील जैवविविधते संदर्भात स्पष्ट माहिती द्यावी असे सांगितले. तसेच पर्यटक व वन्यजीव अभ्यासक गाईड प्रशिक्षण संस्था, पुणे येथील श्री राजीव पंडित यांनी देखील मार्गदर्शन केले. या गाईड प्रशिक्षण कार्यशाळेत १३ विद्यार्थी – विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. महाविद्यालयातील ऑर्किड नेचर क्लबच्या सदस्यांना या गाईड प्रशिक्षणाचा निसर्ग समजून घेणेस खूप फायदा झाला. कार्यशाळा वन्य जीव विभाग कार्यालय, राधानगरी येथे संपन्न झाली. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी ऑर्किड नेचर क्लबचे समन्वयक प्रा. फयाज मोकाशी यांनी विशेष परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment