विभागीय कुस्ती स्पर्धेत राधानगरी महाविद्यालय चॅम्पियन
- Get link
- X
- Other Apps
युवराज पाटील कुस्ती संकुल कुडित्रे (ता.करवीर) येथे पार पडलेल्या शिवाजी विद्यापीठांतर्गत विभागीय कुस्ती स्पर्धेत राधानगरी महाविद्यालयाने ४ सुवर्णपदके पटकावली तसेच कुस्ती मधील प्रतिष्ठेचा चषक आणि जनरल चॅम्पियनशिप पटकावली. क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी केलेल्या राधानगरी महाविद्यालयातील पहिलवान मंडळींनी शिवाजी विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी बजावली. ओंकार लाड (५७ किलो प्रथम) कुलदीप पाटील (६१ किलो प्रथम) प्रतिक म्हेतर (७० किलो प्रथम) आणि ओंकार चौगुले (९२ किलो प्रथम). अशा चार वजनी गटात पदक मिळवून हे सर्व खेळाडू आंतरविभागीय स्पर्धेत पात्र झाले आहेत. या सर्व खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. निलेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या संघातील कुस्तीपटू यांचा सत्कार राधानगरी कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी.एस. मोरुस्कर, शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष सुशील पाटील -कौलवकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कॉलेजमधील सर्व प्राध्यापक व इतर मान्यवर उपस्थित होते
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment