राधानगरी महाविद्यालयास नॅककडून बी प्लस ग्रेड प्रदान नॅक, बेंगलोर यांचेकडून राधानगरी महाविद्यालयाच्या नोव्हेंबर २०२१ पासून सुरू झालेल्या मूल्यमापन प्रक्रियेचा शेवटचा टप्पा म्हणून दि. २५/२६ जुलै २०२२ रोजी कृष्णा विद्यापीठ, हैद्राबादचे माजी कुलगुरू डॅा. व्यंकय्या हुन्नाम यांच्या अध्यक्षतेखाली पिअर टिमने महाविद्यालयास भेट दिली. यावेळी पिअर टिमने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बरोबरीने संस्था प्रतिनिधी, आजी-माजी विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधला. डोंगराळ, दुर्गम आणि अभयारण्य अधिवासातील परिसरात महाविद्यालयाचे उच्च शिक्षणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे मत यावेळी पिअर टिमने नोंदवले. गेले ६ महिने सुरू असलेल्या नॅक प्रक्रियेचा आज अंतिम निकाल आला असून महाविद्यालयास २.७० इतके गुण व बी प्लस ही ग्रेड प्राप्त झाली आहे. महाविद्यालयास मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल विद्यार्थी आणि ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
राधानगरी महाविद्यालय राधानगरी येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात संपन्न झाला. दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी राधानगरी महाविद्यालय राधानगरी च्या ग्रंथालय हॉलमध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र.प्रचार्य डॉ. वसंत ढेरे होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करताना समाजसेवेसाठी व राष्ट्रउभारणीसाठी युवकां बरोबरच सर्वांनी सहकार्य करावे असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. विश्वास पाटील कौलवकर यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना बद्दल सविस्तर माहिती प्रा. संग्राम सिंह पाटील व प्रा. ज्योती इंगवले यांनी दिली. अध्यक्षपदावरून बोलताना प्र. प्राचार्य डॉ. वसंत ढेरे यांनी not me but you या ब्रीद वाक्याचा अर्थ सांगून समाजसेवेसाठी सर्वांनी तत्पर रहावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. के. वाय ए. एकल यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ. नितीन जरंडीकर, प्रा. मोकाशी, ग्रंथपाल के एम कुंभार प्रा. बी. के. पाटील व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
भारतीय संघराज्याचा ७३ वा प्रजासत्ताक दिन महाविद्यालयाच्या प्रांगणात दि. २६ जानेवारी २०२२ रोजी संपन्न झाला. यावेळी राधानगरी महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच राधानगरी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. ध्वजारोहण विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आर. डी. कांबळे यांचे हस्ते झाले.
Comments
Post a Comment