बीए/बी. कॉम. भाग १ ऑन लाईन परीक्षेबाबतच्या महत्त्वाच्या सूचना
बीए/बी. कॉम. भाग १ ऑन लाईन
परीक्षेबाबतच्या महत्त्वाच्या सूचना
१)
ऑन लाईन परीक्षा ही विद्यार्थ्यांनी घरी बसून आपापल्या
मोबाईलवरून द्यायची आहे.
२)
ऑन लाईन परीकक्षेसाठी आपणाकडे स्मार्टफोन/अँड्रॉइड फोन असणे
गरजेचे आहे.
३)
ऑन लाईन परीकक्षेसाठी सर्वप्रथम आपण सोबत दिलेल्या लिंकवर
जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे.
४)
नोंदणी करताना आपण परीक्षेसाठी जो मोबाईल वापरणार आहात, तोच
नंबर द्यावा.
५)
नोंदणीसाठी/परीक्षेसाठी आपल्या ठिकाणी ज्या कंपनीची रेंज
येते, त्या कंपनीचा नंबर द्यावा.
६)
नोदणी करताना तुम्हाला स्वतःचा एक पासवर्ड तयार करावयाचा
आहे. पासवर्ड तुमच्या सोयीने, सोपा आणि तुमच्या लक्षात राहील असा ठेवावा.
७) संपूर्ण परीक्षेसाठी नोंदणी
केलेलाच मोबाईल नंबर आणि पासवर्ड वापरायचा आहे. एकदा नोदणी केलेला मोबाईल नंबर आणि
पासवर्ड बदलून दिला जाणार नाही.
८)
सोबत दिलेल्या लिंकवर जाऊन तिथे आपला PRN टाकावा. त्यानंतर
तिथे तुमचे सर्व डिटेल्स येतील.
९)
तुमच्या दिलेल्या डिटेल्स खाली तुम्ही परीक्षेसाठी जो
मोबाईल वापरणार आहात, तो मोबाईल नंबर टाकावा व Generate OTP यावर क्लिक करावे.
तुम्ही नोंदवलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
१०)
आलेला OTP नोंदणी अर्जात टाकून Verify OTP यावरती क्लिक
करावे.
११)
त्यानंतर तुमचा पासवर्ड तयार करावा.Confirm Password
याठिकाणी तोच पासवर्ड टाकावा. I have verified my name... यावरती क्लिक करून फॉर्म
सबमिट करावा.
१२)
ऑन लाईन परीक्षेचा
सराव होण्यासाठी परीक्षेपूर्वी डेमो एक्झाम घेतली जाईल. त्याचा तपशील लवकरच कळवला
जाईल.
१३) ऑन लाईन परीक्षा नोदणी ही मंगळवार
दि. ०४ मे २०२१ रोजी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत सुरु राहील.
१४)
नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार
नाही, याची नोंद घ्यावी.
१५)
यानंतर पुन्हा ऑफ लाईन परीक्षा होणार नसल्याने सर्वानी ही
परीक्षा देणे अनिवार्य आहे.
१६)
नोंदणी करताना काही अडचण आल्यास ९३२५७४१७१९ या क्रमांकावर
संपर्क साधावा.
प्राचार्य,
राधानगरी महाविद्यालय, राधानगरी
* नोंदणीसाठीची लिंक: http://34.93.148.93:8035/#/
या लिंकवर क्लिक केल्यानंतर खालीलप्रमाणे फॉर्म
ओपन होईल. त्यामध्ये वर दिलेल्या सूचनांप्रमाणे माहिती भरून आपली नोंदणी करावी.
Comments
Post a Comment