Posts

Showing posts from October, 2021

माजी विद्यार्थी मेळावा महाविद्यालयांमध्ये संपन्न

Image
माजी विद्यार्थी  मेळावा  महाविद्यालयांमध्ये संपन्न राधानगरी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आज दि. 23 /10 /2021 इ. रोजी महाविद्यालयांमध्ये संपन्न झाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ वसंत ढेरे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. विश्वास पाटील यांनी केले.              या वेळी बोलताना प्रा. डॉ. ढेरे म्हणाले, महाविद्यालयीन जीवन जगत असताना आलेल्या अनुभवाची शिदोरी बरोबर घेऊन महाविद्यालयाच्या बाहेरचे जग जगताना या महाविद्यालयातील  संस्काराची शिदोरी बरोबर असल्याने संस्कारशील समाज निश्चित घडतो. या संस्कारशील विद्यार्थ्यां कडूनच भावी समाज सुसंस्कृत होतो. तसेच माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे वेळोवेळी लक्ष दिले तर आपल्या मागील पिढीलाही या शिदोरीचा  वाटा निश्चित मिळेल. तसेच इंग्रजीचे डॉ. नितीन जरंडीकर बोलताना म्हणाले,राधानगरी परिसराच्या विकासाच्या दिशेने जाताना इथल्या पर्यावरणाचा होत असणारा र्‍हास, इथल्या स्थानिक लोकांचे प्रश्न, समस्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जाणून घेऊन आपल्या शिक्षणाचा उप...

राधानगरी महाविद्यालय, राधानगरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

Image
 राधानगरी महाविद्यालय, राधानगरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि अंतर्यागत तक्रार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने  आज शुक्रवार,दि. ८ ऑक्टोबर २०२१ रोजी  सायबर गुन्हेगारी या विषयावर  श्रीमती अनुराधा पाटील पोलीस उपनिरीक्षक राधानगरी यांचे व्याख्यान आयोजित केले होते. आपल्या मनोगतात बोलताना अनुराधा पाटील म्हणाल्या, सायबर विषयक गुन्हे हे कधीही माणसाला फसवू शकतात,गुन्हात अडकवू शकतात विशेष करून मुलींनी मोबाईल वापरताना व्हाट्स अॅप असेल, इंस्टाग्राम असेल अथवा आणखी कोणतेही ॲप्स असेल तर अशा अॅपचा वापर करताना काळजीपूर्वक विचार करुन करावा हे ॲप्स खूप उपयुक्तही आहेत तेवढेच धोकादायक आहेत. त्यामुळे त्याचा वापर करताना समजून-उमजून करावा आणि सायबर गुन्हा च्या माध्यमातून खूप मोठी फसवणूक केली जाते असा विचार त्यांनी मांडला. त्याचबरोबर स्त्रियांचे कायदे स्त्रियांचे हक्क स्त्रियांच्या चळवळी याविषयी बोलताना त्यांनी स्त्री कायद्यातील   मुद्द्याच्या आधारे स्त्रीला न्याय मागता येऊ शकतो. स्त्री दुबळी नाही स्त्री सक्षम आहे. या अनुषंगाने आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात प्रा. ऐ...