७४वा स्वातंत्र्य दिन समारोह
।।७४वा स्वातंत्र्य दिन समारोह।। श्री राधानगरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राधानगरी हायस्कूल, राधानगरी ज्युनियर काॅलेज आणि राधानगरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आजरोजी ७४वा स्वातंत्र्य दिन समारोह संपन्न झाला. हायस्कूल आणि ज्युनियर काॅलेजचे मुख्याद्यापक श्री आर.डी. कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी हायस्कूलच्या विद्यार्थीनींनी राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर गीते सादर केली. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. डी.एस.मोरूस्कर, हायस्कूल/काॅलेजमधील शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि निवडक विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य डाॅ. डी. एस. मोरूस्कर यांचा शिवाजी विद्यापीठ अधिष्ठातापदी नियुक्ती झालेबद्दल श्री आर.डी.कांबळे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अरूण पाटील सर आणि शशिकांत बैलकर सर यांनी केले.